‘ह्यूमन कोकेन’मध्ये इशिता राज
ह्यूमन कोकेन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ड्रग रॅकेट, गुन्हेगारी आणि जिवंत राहण्यासाठीची धडपड दाखविणारा आहे. या चित्रपटात पुष्कर जोग हा मराठी अभिनेता दिसून येणार आहे. या चित्रपटात इशिता राज पहिल्यांदाच एका डार्क, ग्रिटी अवतारात दिसू येणार असून यातील तिच्या अभिनयाचे काही पैलू पाहता येणार आहे. सिद्धांत कपूर या चित्रपटातील स्वत:च्या अनोखा लुकचा खास प्रभाव पाडत आहे. वरिष्ठ अभिनेता जाकिर हुसैन यात खलनायकाच्या भूमिकेत आहे. ह्यूमन कोकेन चित्रपटाने मला एक अभिनेता आणि माणूस म्हणून आव्हान दिले. यातील माझी भूमिका स्वत:च्या परिस्थितींमध्ये अडकून पडलेली असून त्यावर त्याचे कुठलेच नियंत्रण नाही. ही भूमिका हतबल, संताप, भीतीने युक्त असल्याचे वक्तव्य पुष्कर जोगने पेले आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सरिम मोमिन यांनी सांभाळली आहे. ह्यूमन कोकेन आमच्या आसपास असलेल्या एका भीतीदायक वस्तुस्थितीचे प्रतिबिंब आहे. याचा उद्देश विचार करण्यास भाग पाडणे आणि चर्चा घडवून आणणे आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा अशा पैलूचे प्रतिनिधित्व करते, जो आम्ही अनेकदा दडवत असतो असे मोमिन यांनी म्हटले. इशिताच्या या चित्रपटाची निर्मिती स्कारलेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड आणि टेक्सस्टेप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट 16 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.