For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इशिता नेगी, देव रुपारेलिया विजेते

06:16 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
इशिता नेगी  देव रुपारेलिया विजेते
Advertisement

वृत्तसंस्था, पुणे

Advertisement

रविवारी येथे झालेल्या इंडिया कनिष्ठांच्या आंतरराष्ट्रीय ग्रा प्री 2026 च्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशिता नेगी आणि देव रुपारेलिया यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीतील अजिंक्यपदे पटकाविली. या स्पर्धेत भारताच्या पवन सुरेश आणि पुनित सुरेश यांनी पुरुष दुहेरीचे तर मोहम्मद झेकारीया आणि आफिझ रेहमदानी यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. थायलंडच्या एम. चानथरात आणि सुट्टीवेरेनॉन यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

रविवारी या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या द्वितीय मानांकित इशिता नेगीने आपल्या देशाच्या गाथा सूर्यवंशीचा 21-19, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत विजेतेपद मिळविले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा टॉप सिडेड देव रुपारेलियाने आपल्या देशाच्या 16 व्या मानांकित निश्चल चंदचे आव्हान 21-16, 21-16 अशा गेम्समध्ये संपुष्टात आणत अजिंक्यपद पटकाविले. त्यानंतर पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पवन आणि पुनित सुरेश यांनी इंडोनेशियाच्या दिसाबाएन आणि मोहम्मद झेकारीया यांचे आव्हान 25-23, 21-19 असे संपुष्टात आणले. मिश्र दुहेरीमध्ये इंडोनेशियाच्या मोहम्मद झेकारीया आणि आफिझ रेहमदानी यांनी भारताच्या पुनित सुरेश व आदिती दीपकराज यांचा 24-26, 21-17, 21-16 अशा गेम्समध्ये 46 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अजिंक्यपद मिळविले. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या एम. चानथरात आणि सुट्टीवेरेनॉन यांनी भारताच्या दिया भिमय्या आणि किर्ती मनचला यांचे आव्हान 21-15, 21-11 असे संपुष्टात आणले. सदर स्पर्धा 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान येथे खेळवली गेली. ही स्पर्धा 19 वर्षाखालील वयोगटासाठी होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.