महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इशाक डार पाकिस्तानच्या उपपंतप्रधानपदी

06:40 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

11 वर्षांनी देशाला मिळाला उपपंतप्रधान : शाहबाज शरीफ यांनी दिली मोठी जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार यांना एक अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. डार आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान देखील असणार आहेत. कॅबिनेट डिव्हिजनकडून एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. यानुसार पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून ही नियुक्ती तत्काळ प्रभावापासून पुढील आदेशापर्यंत करण्यात आली आहे.

डार यांनी कार्यभार सांभाळण्यापूर्वी देशाचे अखेरच उपपंतप्रधान म्हणून चौधरी परवेज इलाही यांनी काम पाहिले हेते. इलाही हे 2012 पासून 16 मार्च 2013 पर्यंत या पदावर होते. आता 11 वर्षांनी पाकिस्तानला उपपंतप्रधान मिळाला आहे.

इशाक डार यांनी नवाज शरीफ यांच्या 1997-99 सरकारमध्ये वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री म्हणून काम केले होते. तसेच दोनवेळा अर्थ, आर्थिक विषयक, महसूल आणि सांख्यिकी मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तर 1992-93 या कालावधीत ते पाकिस्तान गुंतवणूक बोर्डाचे राज्यमंत्री हेते. तसेच लाहोर चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

शरीफ कुटुंबीयांचे निकटवर्तीय

चार्टर्ड अकौटंट आणि अनुभवी राजकीय नेते असलेले 73 वर्षीय डार हे शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे सदस्य आहेत. शरीफ कुटुंबीयांचे निकटचे सहकारी असलेले डार हे मागील दोन सरकारांमध्ये अर्थमंत्री राहिले आहेत. मागील पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (पीडीएम) आघाडी सरकारमध्ये चौथ्यांदा अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांना सर्व आर्थिक समस्यांवरील पक्षाचे ‘उत्तर’ मानले जात होते

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article