For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 रँकिंगमध्ये इशान किशन पाचव्या स्थानी

06:17 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
टी 20 रँकिंगमध्ये इशान किशन पाचव्या स्थानी
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

बुधवारी जारी झालेल्या आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती करीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे तर शिवम दुबे अष्टपैलू खेळाडूंमध्ये सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

सुपरएट गट सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर टी-20 विश्वचषकात भारताचे नशीब घसरले असले तरी त्यांचे दोन तेजस्वी खेळाडू इशान आणि दुबे यांनी काही सामन्यांत चमकदार कामगिरीनंतर त्यांना क्रमवारीत बढती मिळाली आहे. दुबे (दोन स्थानांच्या बढतीनंतर सातवे स्थान) आणि अफगाणचा मोहम्मद नबी (तीन स्थानांच्या बढतीनंतर आठवे स्थान) यांनी ताज्या अपडेटद्वारे चांगली कामगिरी केली आहे. पाच डावांमध्ये दुबेने 31.60 च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये गेल्या आठवड्यात नेदरलँड्सविरुद्ध केलेल्या अर्धशतकाचीही समावेश आहे. याशिवाय त्याने 19.50 च्या सरासरीने चार विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement

किशन (तीन स्थानांची बढती घेत पाचव्या स्थानावर) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (10 स्थानांची प्रगती करीत नवव्या स्थानावर) यांनीही टी-20 फलंदाजांमध्ये टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे तर अफगाणचा इब्राहिम झद्रन (चार स्थानांची प्रगती, 13 व्या स्थानावर), वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप (चार स्थानांनी 14 व्या स्थानावर) आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक (10 स्थानांनी 18 व्या स्थानावर) यांनी लक्षवेधी प्रगती केली आहे. किशनने पाच डावांमध्ये 35.20 च्या सरासरीने आणि 193.50 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतके आहेत. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या 77 धावांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये ब्रेव्हिसने 26.20 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. ज्याचा स्ट्राईक रेट 136.45 आहे. या आठवड्यात भारताविरुद्ध 45 धावांची प्रभावी खेळी करत त्याने डेव्हिड मिलरसोबत भागीदारी करुन द. आफ्रिकेला 20/3 च्या खराब स्थितीतून बाहेर काढले.

झद्रनने टी-20 विश्वचषकातही चांगली कामगिरी केली. अफगाणिस्तानने गट टप्प्यातील सामन्यात कॅनडाविरुद्ध विजय मिळवला. त्यात त्याने नाबाद 95 धावा केल्या. त्याने चार सामन्यांमध्ये 56.66 च्या सरासरीने आणि 142.85 च्या स्ट्राईक रेटने 170 धावा केल्या. त्यामध्ये दोन अर्धशतके होती. काल पाकिस्तानविरुद्ध 51 चेंडूत 100 धावा केल्याने ब्रुकचे नशीबही उंचावले आहे. ज्यामुळे त्याने एकट्याने इंग्लंडला 165 धावांचा पाठलाग करण्यास मदत केली आणि त्यांना उपांत्य फेरीत पोहोचवले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले शतक नोंदवलेल्या कर्णधाराने सहा डावांमध्ये 33.66 च्या सरासरीने आणि 172.64 च्या स्ट्राईकरेटने 202 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि अर्धशतक आहे. होपने विंडीजच्या सुपर एटमधील प्रगतीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने पाच डावांमध्ये 42.25 च्या सरासरीने आणि 133.07 च्या स्ट्राईक रेटने 169 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतके आणि 75 चा सर्वोत्तम स्कोअर आहे.

Advertisement
Tags :

.