For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निकोल किडमनसोबत झळकणार ईशान

06:19 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
निकोल किडमनसोबत झळकणार ईशान
Advertisement

द फरफेक्ट कपल सीरिजद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण

Advertisement

ईशान खट्टर हा बॉलिवूडमधील गुणवंत अभिनेता म्हणून ओळखला जातो. ईशान आता लवकरच एका हॉलिवूड सीरिजमध्ये दिसून येणार आहे. द फरफेक्ट कपल या सीरिजद्वारे तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सीरिजमध्ये निकोल किडमन आणि लिव श्रेइबर मुख्य भूमिकेत आहे.

या सीरिजमध्ये याचबरोबर डकोटा फॅनिंग आणि मेघन फाह हे कलाकारही दिसून येणार आहेत. या सीरिजचा टीझर सादर करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये मी एक रंजक भूमिका साकारत आहे. भारतीय तसेच दक्षिण आशियाई अभिनेत्याला अशाप्रकारची भूमिका सहजपणे मिळत नसल्याचे ईशानने म्हटले आहे.

Advertisement

या सीरिजकडून ईशानला मोठ्या अपेक्षा आहे. निकोल किडमनसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो आनंदी आहे. सुजैन बियर यांच्याकडून दिग्दर्शित या सीरिजमध्ये 6 एपिसोड्स असणार आहेत. ही सीरिज 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.