For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनोदी धाटणीच्या चित्रपटात ईशान खट्टर

06:19 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
विनोदी धाटणीच्या चित्रपटात ईशान खट्टर
Advertisement

अभिनेता ईशान खट्टरने स्वत:च्या छोट्या कारकीर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मागील वर्षी प्रदर्शित ‘होमबाउंड’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे जागतिक स्तरावर कौतुक झाले होते. आता ईशान पुन्हा एकदा नव्या प्रकारच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

Advertisement

ईशान एका विनोदी धाटणीच्या चित्रपटात दिसून येईल. त्याच्या या पुढील प्रोजेक्टविषयी सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही, परंतु याचे चित्रपटाचे दिग्दर्शन पलाश वासवानी करणार असून त्यांना ‘गुल्लक’सारख्या लोकप्रिय वेबसीरिजसाठी ओळखले जाते. या चित्रपटातील नायिकेसाठी अद्याप अभिनेत्रीची निवड झालेली नाही. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील काही महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याचे समजते.

ईशान आता लवकरच ‘द रॉयल्स सीझन 2’मध्ये दिसून येणार आहे. निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. या सीरिजमध्ये ईशान भूमीऐवजी नव्या अभिनेत्रीसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.