For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘विमल खन्ना’मध्ये ईशा तलवार

06:50 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘विमल खन्ना’मध्ये ईशा तलवार
Advertisement

हिंदी साहित्यातील कहाणीवर आधारित सीरिज

Advertisement

अमेझॉन एमएक्स प्लेयरवर ‘विमल खन्ना’ नावाची सर्वाइवल थ्रिलर सीरिज पाहता येणार आहे. प्रसिद्ध लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांच्या ‘द विमल सीरिज’ या कादंबरीवर आधारित ही सीरिज हिंदी साहित्यातील सर्वात लोकप्रिय आणि स्मरणीय पात्रांना पहिल्यांदाच पडद्यावर जिवंत करणारी आहे. सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत सनी हिंदुजा आणि ईशा तलवार आणि तारा अलीशा बेरी आहेत.

याच्या ट्रेलरमध्ये विमल खन्ना सातत्याने पळ काढत असल्याचे दिसून येते. तो विश्वासघात आणि जीवन वाचविण्याच्या संघर्षाच्या धोकादायक जाळ्यात सापडतो आणि प्रत्येकवेळी त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो आणखी खेचला जातो. खोट्या आरोपांमध्ये अडकून स्वत:ची ओळख गमाविलेल्या विमल खन्नाची निर्दोषत्व सिद्ध करण्याची लढाई लवकरच अशा सिस्टीमच्या विरोधात युद्धात बदलते, जी त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू पाहत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.