प्रियंका चोप्रा पेक्षा चांगली भूमिका मी केली असतीः ईशा कोप्पीकर
मुंबई
बॉलीवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर हीने नुकत्याच एका मुलाखती मध्ये एक वक्तव्य केले. ती म्हणाली डॉन २ मधील प्रियंका चोप्राची भूमिका मी जास्त चांगल्या पद्धतीने केली असती.
२००६ मध्ये डॉन २ प्रदर्शित झाला. यामध्ये प्रियंका चोप्राने सुपरस्टार शाहरुख खान सोबत दमदार अॅक्शन सिन्स केले आहेत. या सिनेमात ईशा कोप्पीकरही लहानशा भूमिकेत होती.
ईशा म्हणाली, माझी भूमिका लहान होती, पण प्रियंकाच्या भूमिकेत जास्त ताकद होती. मला जर ती भूमिका करण्याची संधी मिळाली असती तर मी सगळी ताकद पणाला लावून ती भूमिका साकारली असती. मी २५ वर्ष तायक्वांदो शिकले आहे. मी ब्लॅक बेल्ट आहे. उत्तम अॅक्शन करू शकते.
२०११ मध्ये आलेल्या डॉनच्या सिक्वेल साठी मी स्वतःहुन फरहान शी संपर्क केला होता. पण कलाकरांची निवड आधीच झाली असल्याचे त्याने मला सांगितले. असो तुम्ही कधी जिंकता तर कधी हरता, असे ईशाने मुलाखतीत सांगितले.
ईशाचा नुकताय अयलॉन नावाचा सिनेमा आला. तिचा गेल्यावर्षी घटस्फोटही झाला आहे.