इसाबेल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
कॅटरिना कैफची बहिण
बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्रीची बहिण पदार्पण करणार आहे. कॅटरिना कैफची बहिण इसाबेलची बॉलिवूडमधील एंट्री निश्चित झाली आहे. इसाबेल आणि पुलकित सम्राट यांचा चित्रपट ‘सुस्वागतमत खुशामदीद’चा टीझर जारी करण्यात आला आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून तो मे महिन्या प्रदर्शित होणार आहे.
पुलकित आणि इसाबेल या चित्रपटात दोन वेगवेगळ्या धर्मांच्या आणि वेगवेगळ्या देशांशी संबधित असलेल्या व्यक्तिरेखा साकारत आहेत. यातील पुलकितच्या व्यक्तिरेखेचे नाव अमन असून तो भारतीय आहे, तर इसाबेलच्या व्यक्तिरेखेचे नाव नूर असून ती पाकिस्तानची असल्याचे दाखविण्यात आले आहे. दोन भिन्न धर्मांचे असूनही त्यांची प्रेमकहाणी कशी यशस्वी ठरणार हे या चित्रपटात दाखविले जाणार आहे. हा चित्रपट 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाद्वारे इसाबेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणर आहे. इसाबेल ही कॅटरिनाची बहिण असल्याने तिच्याकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सुस्वागतम खुशामदीद या चित्रपटापासून इसाबेलला देखील खूप अपेक्षा आहेत.