For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध तुमच्या हिताचे आहे का?

06:45 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्ध तुमच्या हिताचे आहे का
Advertisement

पेजेश्कियान यांचा अमेरिकेच्या जनतेला सवाल : संघर्ष अन् संवाद दोन्हींसाठी मार्ग खुले

Advertisement

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकेच्या नागरिकांना उद्देशून हे युद्ध खरोखरच्या तुमच्या हिताचे आहे का असा सवाल केला आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान संघर्ष आणि संवाद दोन्हींचे मार्ग खुले आहेत, परंतु कुठली दिशा निवडायची हे अमेरिकेच्या लोकांवर निर्भर असल्याचा दावा मसूद यांनी दुबईतून जारी संदेशात म्हटले आहे.

अमेरिकेच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर

Advertisement

आधुनिक इतिहासात इराणने स्वत:कडे अनेक शेजारी देशांपेक्षा अधिक सैन्यक्षमता असूनही कधीच आक्रमक भूमिका घेतली नाही. आमच्यावर हल्ला करण्यात आल्यास त्याचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत आणि सर्वप्रकारच्या आक्रमकतेला झेलण्यास तयार आहोत असा दावा इराणच्या राष्ट्रपतींनी केला आहे. अमेरिका या संघर्षात इस्रायलसाठी एक प्रतिनिधी म्हणून सामील झाला आहे. इस्रायलने अमेरिकेला या युद्धात खेचले आहे. अमेरिका फर्स्ट खरोखरच अमेरिकेच्या सरकारच्या प्राथमिकतांमध्ये सामील आहे का असा सवालही पेजेश्कियान यांनी उपस्थित केला आहे.

युद्धाचा परिणाम असणार महत्त्वपूर्ण

इराणकडून शेजारी देशांच्या विरोधात करण्यात येणारी कारवाई वैध आत्मरक्षणावर आधारित एक संतुलित प्रतिक्रिया आहे. जग अशा वळणावर उभे आहे, जेथे संघर्षाचा मार्ग पूर्वीपेक्षा अधिक महाग आणि निष्फळ ठरू शकतो. संघर्ष अन् संवादादरम्यान निवड वास्तविक आणि महत्त्वपूर्ण आहे. याचा परिणाम  आगामी पिढ्यांचे भविष्य निश्चित करणार आहे. स्वत:च्या हजारो वर्षांच्या इतिहासात इराणने अनेक हल्लेखोरांना मागे सोडले आहे. हे हल्लेखोर आता केवळ इतिहासाच्या पानांमध्ये बदनाम नावे ठरले आहेत. तर इराण मजबूती आणि सन्मानासह कायम असल्याचे पेजेश्कियान यांनी स्वत:च्या संदेशात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.