For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रंप यांची इस्रायलशी ‘तडजोड’ ?

06:22 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रंप यांची इस्रायलशी ‘तडजोड’
Advertisement

एपस्टिन फाईल्ससंबंधात नव्या गौप्यस्फोटाचा दावा

Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

काही दिवसांपूर्वी गाजलेल्या एपस्टिन फाईल्स प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इस्रायलशी ‘तडजोड’ केली आहे, असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. हा गौप्यस्फोट अमेरिकेची गुप्तहेर संस्था असणाऱ्या एफबीआयनेच एपस्टिन फाईल्समधील काही कागदपत्रांच्या आधारे केला असल्याचे वृत्त अमेरिकेच्या काही वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झाले आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही, असे स्पष्ट होत आहे.

Advertisement

एपस्टिन फाईल्स प्रकरणात ट्रंप यांचे जावई जेरीड क्रूशनर यांचा संबंध आहे, असा आरोप होत आहे. ट्रंप यांच्या प्रथम कार्यकाळात क्रूशनर यांचे ट्रंप यांच्या प्रशासनावर नियंत्रण होते. क्रूशनर यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही आरोप त्या काळात झाले होते. तसेच रशियाचा पैसा आणि इस्रायलच्या अतिउजव्या ‘छबाड’ नेटवर्कशी कूशनर यांचे संबंध होते, असे नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते, असा आरोप आहे..हा आरोप एफबीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. एपिस्टीन फाईल्समध्ये ट्रंप यांच्या बांधकाम व्यवसायासंबंधीही काही गुप्त माहिती संग्रहित आहे. ट्रंप यांनी बेव्हरली हिल्स येथे एक वास्तू 4 कोटी डॉलर्सला विकत घेतली. नंतर तिची किंमत वाढवून ती 9.5 कोटी डॉलर्सना एका विदेशी बनावट कंपनीला विकली. त्यावेळी या व्यवहारासंबंधी आक्षेप घेण्यात आले होते. तथापि, नंतर ते प्रकरण पुढे गेले नाही. इस्रायलला या व्यवहारांसंबंधी माहिती आहे. एपस्टिन यालाही अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी अभय दिले होते, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालामुळे अमेरिकेत खळबळ उडण्याची शक्यता आहे. या आरोपांसंबंधीचे चित्र कालांतराने कदाचित स्पष्ट होईल, अशी शक्यता काही आंतरराष्ट्रीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.