For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rajesh Kshirsagar On Satej patil | 'शक्तीपीठ महामार्ग सतेज पाटलांच्या घरावरून जातोय काय?'; आ. राजेश क्षीरसागरांचा घणाघाती सवाल!

11:44 AM Jun 12, 2026 IST | NEETA POTDAR
rajesh kshirsagar on satej patil    शक्तीपीठ महामार्ग सतेज पाटलांच्या घरावरून जातोय काय    आ  राजेश क्षीरसागरांचा घणाघाती सवाल
Advertisement

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गआमदार सतेज पाटील यांच्या घरावरून जातोय काय? मला वाटत नाही, त्यांच्या घरावरून जात असेल. त्यामुळे त्यांनी फक्त राजकीय विरोधासाठीच शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे. महाराष्ट्राएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या अनेक प्रगत राष्ट्रात हजारो किलोमीटरचे महामार्ग आहेत. त्यामुळे तेथील दळणवळण क्षमता विकासास कारणीभूत ठरत आहे. पण, हा महामार्ग होताना विरोधक राजकीय हेतूनेच विरोध करत असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

Advertisement

समृद्धी महामार्गाला विरोध झाला पण आज ५ तासात शेतकरी बांधवांचा शेतीमाल मुंबई सारख्या मोठ्या शहरातील बाजारपेठेत उपलब्ध होत आहे.त्यामुळे शक्तिपीठ हा शेतकरी बांधवांच्या फायद्याचाच महामार्ग आहे. यामध्ये अनेक शक्तीस्थळे, बंदरे, प्रमुख शहरे, बाजारपेठां जोडल्या जाणार आहेत. पण, सत्ता नाही, काही काम नाही म्हणून शक्तिपीठला विरोधाचे काम विरोधकांकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.