कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलिस जबानी घेत नाही की रामा पोलिसांना टाळत आहे?

12:34 PM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हल्ला प्रकरणाच्या चौकशीत मोठे प्रश्नचिन्ह : वेगळे वळण लागण्याची शक्यता 

Advertisement

पणजी : रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाला आठ दिवस झाले तरी अद्याप हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंड कोण त्याचा शोध लागत नाही. रामा काणकोणकर यांची जबानी नोंद झालेली नाही. संशयितांनी जो मोबाईल फोन मांडवी नदीत फेकला होता, त्याचा शोध लागणे महत्वाचे आहे. काणकोणकर हे गोमेकॉत उपचार घेत असून जबानी नोंद करण्यासाठी तपास अधिकारी रोज त्यांच्याकडे जातात. मात्र त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे सांगितल्यावर पोलिस परत येतात. काणकोणकर खरोखरच तंदुऊस्त नाही की कुणाच्या दडपणाखाली येऊन पोलिसांना जबानी देत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या दिवशी रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाला त्याच दिवशी अवघ्या काही वेळाने रामा काणकोणकर हे पत्रकाराशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काणकोणकर यांनी सरकार, प्रशासन, न्यायालय या सर्वांवर ताशेरे ओढले होते.

Advertisement

मात्र आता आठ दिवस झाले तरी त्याची जबानी नोंद होत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण याबाबत सर्वांना उत्सूकता लागून राहिली आहे. काणकोणकर यांची जबानी नोंद होत नाही तो पर्यंत तपास पुढे जाणे कठीण आहे. मास्टरमाईंडपर्यंत पोचणे कठीण आहे. वैयक्तिक कारणामुळे काणकोणकर यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे अटक केलेल्या संशयितांनी उलट तपासणी दरम्यान पोलिसांना सांगितले आहे. मात्र संशयित खोटे बोलत आहेत हे पोलिसांना माहित असून रामा काणकोणकर यांची जबानी नोंद होऊ न शकल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रामा काणकोणकर हे सध्या गोमेकॉत उपचार घेत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक आमदार आणि समाज कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी ते व्यवस्थित बोलतात. बुधवारी मायकल लोबो तसेच पीएफजीचे महेश म्हांबरे, अॅङ हृदयनाथ शिरोडकर व अन्य काही जणांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. असे असताना ते पोलिसांना जबानी का देत नाही. पोलिस जबानी नोंद करीत नाही की रामा पोलिसांना टाळत आहे, असा प्रश्न निर्माण झाला असून हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article