For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत आहे?

07:00 AM Sep 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत आहे
Advertisement

भारत अनेक लहान देशांच्या तुलनेत मागे असल्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आपल्या प्राचीन संस्कृती, सभ्यता, वारसा, अध्यात्म, नैसर्गिक आकर्षणे आणि अनेक उत्कृष्ट पर्यटन स्थळांसाठी ओळखला जातो. पण असे असूनही, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातील विदेशी पर्यटकांची संख्या कमी होत आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षी भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 8.1 टक्के घट झाली. प्रवास आणि पर्यटन उद्योगाशी संबंधित काही अधिकाऱ्यांच्या मते, भारतातील विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होण्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया किचकट आहे. याशिवाय, येथील सुरक्षा, फसवणूक आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे विदेशी नागरिक भारतात येणे पसंत करत नाहीत. गेल्या वर्षी भारतात आलेले बहुतेक विदेशी नागरिक उत्तर अमेरिका आणि युरोपमधील होते.

Advertisement

विदेशी पर्यटकांपासून मिळणारे उत्पन्नही कमी

भारतात पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक देशांशी करार केले जात आहेत. पण असे असूनही, विदेशी पर्यटकांपासून मिळणारे उत्पन्न घटत आहे. सौदी अरेबिया, थायलंड, तुर्की यांसारख्या देशांच्या तुलनेत भारताचे विदेशी पर्यटकांपासून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. नीती आयोगाने जूनमध्ये आकडेवारी प्रसिद्ध केली होती, त्यानुसार भारताचे विदेशी पर्यटकांपासून मिळणारे उत्पन्न 35 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी 91.5 लाख विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती. त्यापैकी बहुतेक जण उपचारासाठी आपल्या नातेवाईकांना भेटायला आले होते. सुट्ट्या घालवण्यासाठी येथे आलेले विदेशी पर्यटक केवळ 20 ते 30 लाख होते.

देशांतर्गत पर्यटनात वाढ

भारतात विदेशी पर्यटकांची संख्या कमी होत असली तरी, देशांतर्गत पर्यटनात 46 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. देशांतर्गत पर्यटनातील सर्वाधिक वाढ धार्मिक स्थळांमध्ये दिसून आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मध्य पूर्वेतील तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कमी डॉलर खर्च करण्याचे आणि कमी सोने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. यानंतर भारतातून विदेशात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.

Advertisement
Tags :

.