For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jaysingpur fake ghee | तुम्ही खात असलेलं तूप खरं की खोटं? जयसिंगपुरात तब्बल पावणेदोन लाखांचा 'हा' बनावट साठा जप्त!

11:12 AM Jun 02, 2026 IST | NEETA POTDAR
jaysingpur fake ghee   तुम्ही खात असलेलं तूप खरं की खोटं  जयसिंगपुरात तब्बल पावणेदोन लाखांचा  हा  बनावट साठा जप्त
Advertisement

                          जयसिंगपुरात बनावट तूप कारखान्यावर छापा;

Advertisement

जयसिंगपूर -जयसिंगपूर येथे बनावट तूप उत्पादन करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही कोल्हापूर जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने केली असून शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोड येथे बनावट तूप उत्पादन करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयास मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवार दि. २९ मे रोजी राहुल भाऊसो मगदूम यांच्या राहत्या घरी अन्न सुरक्ष पथकाने अचानक छापा टाकून तपासणी केली. यात बनावट व बेकायदेशीरपणे तूपाचे उत्पादन,साठा आणि विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई झाली असून या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी पी. के. घुगे यांनी म्हैस तूप व गाय तूपाचे एकूण ४ अन्न नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत ५९५ लिटरचा तब्बल १ लाख ७८ हजार रुपयेचा मुद्देमाल आहे.ही कारवाई श्रीमती प्र. साळुंखे यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त (अन्न) श्रीमती प्र. प्र. फावडे यांच्या मार्गदर्शनाने झाली.

Advertisement
Tags :

.