For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Farmers | सर्जा-राजाची जागा यंत्रांनी घेतली! चाफळ भागात आधुनिक औजारांच्या वापरामुळे बैलजोडीचे महत्त्व घटले

01:26 PM Jun 15, 2026 IST | NEETA POTDAR
maharashtra farmers   सर्जा राजाची जागा यंत्रांनी घेतली  चाफळ भागात आधुनिक औजारांच्या वापरामुळे बैलजोडीचे महत्त्व घटले
Advertisement

चाफळ : जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करत आहे. बागायती शेती मशागतीसाठीही आता आधुनिक औजारांचा वापर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे असलेली बैलजोडी आता फक्त नावापुरतीच उरते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.

Advertisement

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. हरित क्रांतीचा साज लेवून आलेले शेतीक्षेत्र सुद्धा त्याला अपवाद नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीकेली जात असल्याने बैलजोडीचा वापर शेतामध्ये आता कमी होत चालला आहे. पूर्वी मशागतीसाठी सर्रास बैलजोडीचा वापर होत असे. नांगरट, कुळवणी, पेरणी, ऊस फोडणे, बांधणी, विहिरीतून मोटेद्वारे पाणी काढून शेतीला देणे, पिकांची खळ्यावर मळणीकरणे अशी बरीचशी कामे बैलजोडीमार्फत केली जात होती. अन्नधान्य, चारा, वैरण व अन्य साहित्याच्या वाहतुकीसाठीही बैलजोडीचा वापर केला जात असे.

फार पूर्वी लग्नासाठी नवरा अथवा नवरीकडच्या वऱ्हाडाची ने-आण करण्यासाठी बैलजोडीचा वापर केला जात असे. कालांतराने शेतामध्येयांत्रिक अवजारांचा वापर हळूहळू सुरू झाला. तिथून खरे तर बैलजोडीचे महत्त्व कमी होत गेले. आज शेतातील जवळपास सर्व कामांसाठी बैलजोडीऐवजी शेतकरी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात बैलजोडीचे अस्तित्व राहील की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.

Advertisement

आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे ऊस बागायतीची मशागतही यंत्राच्या सहाय्याने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचतो. मात्र याच कामासाठी असलेल्या बैलजोडीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. जनावरांसाठी

Advertisement
Tags :

.