प्रार्थनास्थळ आहे का रेसलिंग रिंग?
प्रार्थनेनंतर तुटतात जबडे, लोक वाजवतात टाळ्या
जेव्हा प्रार्थनास्थळाचा विचार मनात येतो, तेव्हा आमच्या मनात शांत, पवित्र आणि अध्यात्मिक ठिकाणाचे चित्र उभे राहते. प्रार्थनास्थळी लोक स्वत:चे मन परमात्म्यासमोर मोकळं करत असतात. प्रार्थना करून आत्मिक शांती मिळवत असतात. परंतु एका प्रार्थनास्थळी प्रार्थना झाल्यावर जबरदस्त रेसलिंग होते आणि प्रेक्षक टाळ्या वाजवून यात सामील स्पर्धकांचा उत्साह वाढवत असतात.
इंग्लंडच्या शिप्ले शहरात सेंट पीटर्स एंग्लिकन चर्च असून ज्याला आता लोक रेसलिंग चर्च या नावाने देखील ओळखू लागले आहेत. येथे दर महिन्याला एका खास प्रकारच्या रेसलिंगचे आयोजन केले जाते, ज्यात पैलवान रिंगमध्ये उतरतात आणि चांगले विरुद्ध वाईट या युद्धाच्या स्वरुपात क्रीडा प्रकाराला सादर करतात.
या चर्चची सुरुवात 37 वर्षीय गॅरेथे थॉम्पसन यांनी केली होती. रेसलिंग आणि येशू ख्रिस्तांमुळे जीवन बदलून गेल्याचे त्यांचे मानणे होते. थॉम्पसन हे कधीकाळी रेसलिंग करत होते आणि जीवनाच्या एका टप्प्यात त्यांनी स्वत:ला जवळपास गमाविले होते. त्या अवघड काळात त्यांना धर्म आणि रेसलिंगने सहारा दिला. येथूनच त्यांना धर्म आणि रेसलिंग एका व्यासपीठावर आणण्याची कल्पना सुचली. याच्या माध्यमातून लोकांना देवाचा संदेश समजण्यासोबत एका रोमांचक पद्धतीने चांगल्या-वाईटातील फरकही कळावा असा विचार थॉम्पसन यांनी केला होता.
दर महिन्यात या चर्चमध्ये एक इव्हेंट आयोजित होतो, ज्यात चर्चमध्ये प्रथम प्रार्थना होते, यानंतर काही मिनिटातच चर्च रेसलिंग रिंगमध्ये रुपांतरित होतो. तेथे प्रेक्षकांसाठी चहुबाजूला खुर्च्या ठेवल्या जातात आणि रेसलल स्क्रिप्टेड लढतींद्वारे धार्मिक आणि नैतिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवितात. अलिकडेच झालेल्या एका इव्हेंटमध्ये सुमारे 200 लोक सामील झाले. त्यांनी प्रथम प्रार्थना केली आणि मग दोन तासांपर्यंत रेसलिंग सामना चालला. यावेळी मुले आणि युवा या अनोख्या अनुभवाने अत्यंत उत्साहित दिसून आले.