कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मैदानातील आऊट फिल्डच्या मातीकामात बेजबाबदारपणा

01:01 PM Mar 18, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / संग्राम काटकर : 

Advertisement

माजी आमदार जयश्री जाधव यांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानामधील आऊट फिल्डच्या अंडर ग्राऊंडमधून ड्रेनेजची व्यवस्था केली. पावसाचे पाणी मैदानाच्या मातीतून झिरपून ते अंडर ग्राऊंड गटारीतून बैठक व्यवस्थेजवळ केलेल्या गटारीकडे सोडण्याची व्यवस्था केली आहे. पुढे हे पाणी रावणेश्वर मंदिरासमोरील चाचीत सोडण्याचीही व्यवस्था केली. हे काम चांगले असले तरी ठेकेदाराने नियोजनानुसार मैदानातील आऊट फिल्डवरील उकरलेली माती न चाळताच पसरल्याचे आणि माती घट्ट करण्यासाठी पाणी फवारणी न करता रोलिंग केल्याचे दिसत आहे. मातीमध्ये हजारो लहान-मोठे खडकही दिसताहेत. मुलांनी तर मातीवरच फुटबॉल खेळून ती विस्कळीत केली आहे. त्यामुळे आधीच दुरवस्थेत राहिलेल्या स्टेडियमच्या वादात आता माती कामाच्या वादाची भर पडली आहे.

Advertisement

गेल्या पंधरा वर्षांपासून छत्रपती शिवाजी स्टेडियमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्फ खेळपट्टीला मानव निर्मित ग्रहण लागले आहे. खेळाडूंनी चक्क टर्फ खेळपट्टीवर सातत्याने फुटबॉल खेळून तिचा आंतरराष्ट्रीय दर्जाच घालवला आहे. तीन वर्षापूर्वी स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेचे केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवालही तर धक्कादायक आला आहे. बैठक व्यवस्था कोणत्याही क्षणी कोसळेल, असा शेराही अहवालात आहे. पाच वर्षांपूर्वी तत्कालिन जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्टेडियम सर्व बाजूंनी सुसज्ज व्हावे हा उद्देश घेऊन आराखडा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी दोन-तीनदा स्टेडियमची पाहणी कऊन स्टेडियममध्ये काय काय करता येईल, याचा ठोकताळा बांधला होता. परंतू कालांतराने त्यांची बदली झाली आणि स्टेडियमच्या आराखड्याचे कामच बारगळले.

शासनाच्या जिल्हा क्रीडा संकूल कार्यकारी समितीकडे स्टेडियमची देखभाल आहे. परंतू समितीही स्टेडियमच्या दुरवस्थेला गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळेच स्टेडियमचा नको इतका दर्जा घरसला आहे. 2022 साली स्टेडियमचा घसरता दर्जा लक्षात घेऊन माजी आमदार जयश्री जाधव यांनी स्टेडियम क्रिकेट स्पर्धा खेळवण्यालायक करण्याचे आणि पावसाचे पाणी स्टेडियमबाहेर घालवण्याचे काम हाती घेतले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्टेडियमच्या सुधारणेबाबत जाधव यांनी मुद्दा मांडून निधी मागितला. तत्कालिन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कामाला मंजूरी देत 2 कोटी ऊपयांचा निधीही दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडे स्टेडियमचे कामही सोपवले. त्याने मिळत राहणाऱ्या निधीतून मार्च 2024 पासून स्टेडियमच्या आऊटफिल्डमध्ये साचून राहणारे पावसाचे पाणी स्टेडियमच्या बाहेर घालण्यासाठी अंडर ग्राऊंड गटार बनवली. स्टेडियममध्ये साचणारे पावसाचे पाणी झिरपत अंडर ग्राऊंड गटारीतून स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेकडे घेण्यासाठी मोठे गटार बांधले. या गटारीतील पाणी रावणेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावरील चाचीत सोडण्याची व्यवस्था केली. त्यामुळे भविष्यात स्टेडियमच्या आऊट फिल्डमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही हे हिताचे काम झाले आहे. असे असले तरी ठेकेदाराने नियोजनानुसार मैदानातील आऊट फिल्डवरील उकरलेली माती चाळून न घेताच पसरल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय या मातीत हजारो दगडही पहायला मिळताहेत. शिवाय पसरलेली माती घट्ट करण्यासाठी पाणी फवारत रोलिंग करणे अपेक्षित होते. परंतू तसेही काम झाले नसल्याने मातीत एकजीनसीपणा आलेला नसल्याचे सांगत जाणकार खेळाडूंनी ठेकेदाराच्या कामावर आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत संबंधीत ठेकेदार स्टेडिममधील माती चाळून स्टेडियममध्ये पसरवणार नाही आणि पाणी फवारणी करत मातीवर रोलिंग करणार नाही, तोपर्यंत कामचे बिल काढले जाणार नाही, अशा भूमिकेवर माजी आमदार जयश्री जाधव ह्या आल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे ठेकेदाराला बिल हवे असले तर माती काम चांगल्या पद्धतीने करावेच, लागणार आहे.

शिवाजी स्टेडियमच्या मैदानातील आऊटफिल्डमध्ये केलेल्या मातीकामात लहान-मोठे दगड सपशेल दिसत आहेत. खेळांचा सराव करताना हे दगड खेळाडूंना जखमी कऊ शकतात. तेव्हा ठेकेदारांनी स्टेडियमला भेट देऊन मैदानात दगड कसे आले हे तर पहावेच. शिवाय लवकरात लवकर मैदानातील सर्व दगड उचलून ते मैदानाबाहेर टाकण्याचे काम करावे. तसेच मैदानातील माती कामाबाबत पुन्हा तक्रार येणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.

                                                    नीलिमा अडसुळ (सचिव : जिल्हा क्रीडा संकूल समिती)

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article