आजगाव वाघबीळ येथील लोखंडी रेंलिग तुटल्याने अपघातास आमंत्रण
दुर्घटना होऊन बळी गेल्यास जबाबदार कोण ?
न्हावेली/वार्ताहर
मळेवाड ते शिरोडा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आजगाव वाघबीळ येथे खोल दरी असून या वळणदार रस्त्याच्या कडेला अपघात होऊ नये म्हणून लोंखडी रेलिंग करण्यात आले आहे.मात्र या रेलिंग मधील काही भाग तुटून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.त्यात करुन या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी रस्त्यावर आल्याने वाहन चालवणे मुश्किल बनले आहे.आजगाव वाघबीळ येथे अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेले लोंखडी रेलिंग तुटल्याने एखादे वाहन बाजूला गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यात करुन या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे वाहनधारकांना हा तुटलेला भाग लक्षातच येत नाही.आजगाव वाघबीळ येथे तुटलेल्या रेलिंगच्या खाली खोल दरी असून या तुटलेल्या लोंखडी रेलिंग तसेच दुतर्फा वाढलेल्या झाडीबाबत तात्काळ बांधकाम विभागाने लक्ष घालून पुढे होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वाहनचालक ग्रामस्थ करत आहेत.