टिळकवाडी येथील रेल्वेगेटचा लोखंडी खांब निकामी
12:34 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत रेल्वेगेटचा लोखंडी खांब निकामी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामुळे रेल्वेगेट उघडणे व बंद करणे अवघड झाले. याचा परिणाम वाहतुकीवर होऊन कोंडी झाल्याचे दिसून आले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नोकरदारांमधून संताप व्यक्त करण्यात आला. रेल्वेगेट मोडून पडल्याची घटना ही काही पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वीही अनेकवेळा वाहनांची धडक बसून तर काहीवेळा रेल्वेगेट निकामी होऊन लोखंडी खांब निकामी झाला आहे. सोमवारी अशाचप्रकारे लोखंडी खांब मोडल्याने दुसरे रेल्वेगेट मार्गाने वाहतूक वळवावी लागली.
Advertisement
Advertisement