For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅम्प येथे पुन्हा लोखंडी कमान

12:15 PM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅम्प येथे पुन्हा लोखंडी कमान
Advertisement

बेळगाव : शहरातील कॅम्प येथील अवजड वाहतूक रोखण्यासाठी हिंडलगा रोड येथील गांधी स्मारकाजवळ पुन्हा नव्याने कमान उभारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अपघातामुळे या कमानीचे नुकसान झाले होते. कमान नसल्यामुळे या मार्गावरून पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाली होती. त्यामुळे नव्याने कमान उभारण्यात येत आहे. ग्लोब थिएटरपासूनच्या इंडिपेंडंट रोडवर अनेक शाळा आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी कॅम्प भागात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी असते. परंतु याच काळात अवजड वाहतूक सुरू असल्याने अनेक लहान मोठे अपघात होत होते. चार वर्षांपूर्वी कॅम्प येथे एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

Advertisement

त्यानंतर कॅम्प येथील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात होती. कॅन्टोन्मेंट बोर्ड व मराठा लाईट इन्फंट्रीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ग्लोब थिएटर, मिलिटरी महादेव मंदिर व गांधी स्मारक परिसरात लोखंडी कमानी उभारण्यात आल्या. परंतु रात्रीच्यावेळी या कमानी दृष्टीस न पडल्याने अनेकवेळा अवजड वाहनांनी धडक दिल्याने कमानीचे नुकसान झाले आहे. गांधी स्मारक येथील लोखंडी कमानीचे काही दिवसांपूर्वी नुकसान झाले होते. त्यानंतर या कमानीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मंगळवारी या कमान बसविण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.