इरीगेसी चौथा तर गुकेश पाचव्या स्थानी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ताज्या बुद्धिबळपटूंच्या मानांकन यादीत भारताचे ग्रॅन्डमास्टर अर्जुन इरीगेसी आणि विश्व चॅम्पियन डी.गुकेश यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान कायम राखले आहे. भारतीय बुद्धिबळ क्षेत्राच्या इतिहासामध्ये माजी ग्रॅन्डमास्टर विश्वनाथन् आनंदनंतर तसेच जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात 2800 इलो रेटिंग नोंदविणारा इरीगेसी हा भारताचा दुसरा तर जागतिक बुद्धिबळपटूंमध्ये 16 वा बुद्धिबळपटू आहे. इरीगेशनने 2801 इलोरेटींग गुण मिळवित मानांकनात चौथे स्थान राखले आहे. तर भारताचा 18 वर्षीय वर्ल्डचॅम्पियन गुकेशने 2783 इलो रेटींग गुण घेत पाचवे स्थान मिळविले आहे. बुद्धिबळपटूंच्या ताज्या मानांकन यादीत नॉर्वेचा ग्रॅन्डमास्टर मॅग्नस कार्लसन 2831 रेटिंग गुणासह पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेचे फॅबीयानो केरुना 2803 रेटिंग गुणासह दुसऱ्या तर अमेरिकेच्या हिकारु नाकामुरा 2802 रेटिंग गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा आनंद बुद्धिबळपटूंच्या मानांकन यादीत पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले असून तो 2750 इलो रेटिंग गुण नोंदविले आहेत. या मानांकन यादीत इरीगेसी, गुकेश आणि आनंद यांच्या शिवाय आणखी सहा भारतीय बुद्बिबळपटूंनी पहिल्या 50 बुद्धिबळपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. आर. प्रग्यानंद 13 व्या, ए. चिदंबरम 23 व्या, विदित गुजराती 24 व्य, पी. हरिकृष्णा 36 व्या, निहाल सरीन 41 व्या आणि रोनक साधवाणी 48 व्या स्थानावर आहे.