For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्णय नाही झाला तर गप्प बसणार नाही...मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार- राजू शेट्टी

05:40 PM May 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
निर्णय नाही झाला तर गप्प बसणार नाही   मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार  राजू शेट्टी
Advertisement

राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र ( पाणी मीटर ) बसविले जाणार आहेत हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलना दरम्यान दिला.

Advertisement

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतक-यांच्यावतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे- बेंगलोर महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले. या दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सरकारकडून ६ जून रोजीच्या बैठकीचे लेखी पत्र दिले. आता यासंदर्भात ६ तारखेला बैठक होणार असल्याने रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात येऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची ठरणार आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. एकीकडे सरकार शेतक-यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय लादत असून दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ.आर.पी मध्येही तोडमोड करून तुकड्यामध्ये शेतक-यांना ऊस बिले अदा करत आहेत. याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एकरक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

Advertisement

यावेळी व्यासपीठावर श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर , आमदार सतेज पाटील , आमदार अरूण लाड , मा. आमदार संजयबाबा घाटगे , इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील- किणीकर, राजारामबापू साखरचे चेअरमन प्रतिक पाटील, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, बाजार समिती सभापती भारत पाटील, करवीर पंचायतीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांचेसह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

Advertisement

.