इस्रायलच्या हल्ल्यात आयआरजीसी गुप्तचर प्रमुख ठार
युद्धात इराणला मोठा झटका
इराणच्या आयआरजीसीने गुप्तचर संघटनेचा प्रमुख माजिद खादेमीच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. आयआरजीसीने इराणची सुरक्षा आणि क्रांतीसाठी खादेमीच्या ‘दशकांच्या सेवे’चे स्मरण केले. खादेमीने गुप्तचर अन् सुरक्षा अभियानांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती असे आयआरजीसीकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले आहे.
जनरल माजिदीने इस्लामिक प्रजासत्ताकच्या रक्षणार्थ सुमारे निम्म्या शतकापर्यंत सेवा केली. खादेमीच्या ‘विदेशी शत्रू आणि घुसखोरीच्या कटां’च्या विरोधातील योगदानाचे कौतुक करण्यात आले. आयआरजीसीने त्यांच्या रिकॉर्डला आगामी काळाच्या गुप्तचर पिढ्यांसाठी ‘स्थायी’ आणि अनुकरणीय’ ठरविले आहे.
माजिद खादेमी कोण होते?
ब्रिगेडियर जनरल माजिद खादेमी हे इराणच्या सर्वात शक्तिशाली सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी एक होते. जून 2022 मध्ये त्यांना आयआरजीसीच्या गुप्तचर संरक्षण संघटनेचा प्रमुख नियुक्त करण्यात आले होते. 2025 पर्यंत त्यांनी मोहम्मद काजेमीच्या जागी आयआरजीसी गुप्तचर संघटनेचे प्रमुखपद सांभाळले होते. काजेमीचा पूर्वीच्या संघर्षात मृत्यू झाला होता. खादेमी केवळ सामरिक अधिकारी नव्हते, तर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि रणनीतिक संरक्षणशास्त्रात पीएचडी मिळविली होती.
माजिद खादेमीची कारकीर्द
आयआरजीसी गुप्तचर प्रमुख (2025-26) : खादेमीला 19 जून 2025 रोजी आयआयजीसी गुप्तचर संघटनेचा प्रमुख नियुक्त करण्यात आले, त्यांनी मोहम्मद काजेमीचे स्थान घेतले.
गुप्तचर संरक्षणाचे प्रमुख (2022-25) : मुख्य गुप्तचर शाखेचे नेतृत्व करण्यापूर्वी त्यांनी आयआरजीसी गुप्तचर संरक्षण संघटनेचे नेतृत्व केले, जी संघटनेतील हेर शोधून काढणे आणि अंतर्गत देखरेखीवर केंद्रीत होती.
संरक्षण मंत्रालय (2018-22) : खादेमी यांनी इराणच्या संरक्षण मंत्रालयात माहिती संरक्षण संघटनेचेही नेतृत्व केले होते.