आयआरएफसीचा 1802 कोटीचा नफा
07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : रेल्वे क्षेत्रातील कंपनी आयआरएफसी यांनी तिसऱ्या तिमाहीत नफ्यामध्ये दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने डिसेंबर 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत 1802 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. नवरत्न गटामध्ये सामील असणाऱ्या या कंपनीचा हा आजवरचा सर्वाधिक नफा मानला जात आहे. उत्पन्न आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहित 6719 कोटी रुपये इतके होते. तर मागच्या वर्षी 6766 कोटींचे उत्पन्न कंपनीने मिळवले होते. रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कार्यरत कंपनीचा नफा मागच्या वर्षी समान अवधीत 1631 कोटी रुपये होता.
Advertisement
Advertisement