आयआरएफसीचा समभाग वधारला
06:12 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात आयआरएफसीच्या समभागाने मंगळवारी तेजी अनुभवली आहे. 13 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आल्याच्या बातमीने समभागाला मंगळवारी तेजी राखता आली. समभाग शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 3.91 टक्के वाढत 92 रुपयांवर पोहचला होता. यापूर्वीच्या एक दिवस आधी पाहता समभाग एक वर्षाच्या नीचांकी स्तरावर 89 रुपयांवर घसरला होता. आयआरएफसीने एचयुआरएलसोबत 12842 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा करार केला आहे. या कराराचा फायदा कंपनीचा समभाग तेजीत येण्यास झाला.
Advertisement
Advertisement