For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयर्लंडच्या भारतवंशीय पंतप्रधानांचा राजीनामा

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयर्लंडच्या भारतवंशीय पंतप्रधानांचा राजीनामा
Advertisement

वैयक्तिक, राजकीय कारणांमुळे पदत्याग : लिओ वराडकर

Advertisement

वृत्तसंस्था /डब्लिन

आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या फाईन गेल पक्षाचे नेतेपदही सोडले आहे. ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान होते. आपल्या पदत्यागाची कारणे वैयक्तिक आणि राजकीय असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. तसेच आता आपल्याला देशाच्या आघाडी सरकारला दुसऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याची संधी द्यायची आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. 45 वषीय लिओ हे आयर्लंडचे सर्वात तऊण पंतप्रधान होते आणि त्यांची ही दुसरी टर्म होती. 2017 मध्ये वयाच्या 38 व्या वषी ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1979 रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला. ते गेली सात वर्षे पंतप्रधानपदी विराजमान होते. गेली सात वर्षे या पदावर राहिल्यानंतर आता या पदासाठी मी योग्य व्यक्ती आहे असे वाटत नाही. आता स्थानिक युरोपियन निवडणुका लढवणारे हे निष्ठावंत सहकारी आणि चांगले मित्र असून मी त्यांना शक्मय तितकी सर्वोत्तम संधी देऊ इच्छितो, असे ते म्हणाले.

Advertisement

9 एप्रिलला नवीन पंतप्रधानांची निवड

वराडकर यांनी नुकताच राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. डब्लिनमधील सरकारी इमारतींच्या पायऱ्यांवरून भावनिक भाषणात त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाने नव्या नेत्यासाठी उमेदवारी सुरू केली आहे. यासंबंधीचा निकाल 5 एप्रिल रोजी घोषित केल्यानंतर 9 एप्रिल रोजी संसदेत नवीन पंतप्रधानांसाठी निवडणुका होतील.

Advertisement
Tags :

.