For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसीआयसीआय लोम्बार्डवर आयआरडीएआयचा मोठा दंड; 1 कोटी रुपयांची कारवाई

12:28 PM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयसीआयसीआय लोम्बार्डवर आयआरडीएआयचा मोठा दंड  1 कोटी रुपयांची कारवाई
Advertisement

नवी दिल्ली : देशातील प्रमुख खासगी विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सवर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयने 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आउटसोर्सिंग पद्धती, विक्रेता व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट प्रशासनातील त्रुटींप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

आयआरडीएआयने 2019 मध्ये केलेल्या तपासणीदरम्यान कंपनीच्या कामकाजातील काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. कंपनीने केलेल्या सेल्स मार्केटिंग आणि व्यवसाय सहाय्याशी संबंधित खर्चाच्या तपासणीतही नियामकाला काही अनियमितता आढळल्याचे सांगण्यात आले.

आर्थिक वर्ष 2018 19 मध्ये आयसीआयसीआय लोम्बार्डने या मदतीसाठी 709.57 कोटी रुपये खर्च केले होते. यापैकी सुमारे 35 ते 37 कोटी रुपये इतर विमा कंपन्यांच्या वैयक्तिक एजंटना देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.

Advertisement

इतर विमा कंपन्यांच्या एजंटचा वापर

आयआरडीएआयच्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय लोम्बार्डने कार्यक्रम व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी इतर विमा कंपन्यांच्या एजंटचा वापर केला. मात्र, या कामांसाठी पुरेशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे नियामकाच्या तपासणीत आढळले.

तसेच या कार्यक्रम व्यवस्थापनाच्या कामांचे आउटसोर्सिंग करण्यात आलेल्या कामांमध्ये वर्गीकरण करण्यात कंपनी अपयशी ठरली. याशिवाय या कामांची माहिती आउटसोर्सिंग रिटर्नमध्येही सादर करण्यात आली नसल्याचे आयआरडीएआयने म्हटले आहे.

आयआरडीएआयने 7 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात नमूद केले की, कार्यक्रम व्यवस्थापनाच्या सेवांचे आउटसोर्सिंग म्हणून वर्गीकरण न केल्यामुळे कंपनीने या खर्चाची आउटसोर्सिंग रिटर्नमध्ये नोंद केली नाही. त्यामुळे नियामकाकडून वेळेवर तपासणी होण्यापासून हे खर्च दूर राहिले.

या प्रकरणातील त्रुटी आणि नियामकाच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आयआरडीएआयने आयसीआयसीआय लोम्बार्डवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Advertisement
Tags :

.