महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सौदी अरेबिया, जॉर्डन, युएईला इराणची धमकी

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलच्या रक्षणासाठी धावून आलात तर....

Advertisement

वृत्तसंस्था/जेद्दा

Advertisement

इराणकडून हल्ला होण्याची शक्यता पाहता इस्रायलकडून संरक्षणासाठी मोठी तयारी केली जात आहे. इजिप्तने स्वत:च्या एअरलाइन्सच्या विमानांना काही काळासाठी इराणच्या क्षेत्रातून उ•ाण न करण्याचा निर्देश दिला आहे. तर जॉर्डनने देखील स्वत:च्या विमानांना 45 मिनिटांपर्यंतच्या उ•ाणासाठी पुरेल इतके अतिरिक्त इंधन राखण्याची सूचना केली आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) सदस्य देशांची तातडीची बैठक झाली असून यात इराणने इस्रायलवर हल्ला करणार असल्याचे सांगत अरब देशांना धमकी दिली आहे. अरब देशांनी या लढाईपासून दूर रहावे. प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केला तर इस्रायलला साथ देणाऱ्या देशांच्या विरोधातही कारवाई करू अशी धमकी इराणच्या प्रतिनिधीने ओआयसीच्या बैठकीत अरब देशांना दिली आहे. इराणच्या अंतरिम विदेश मंत्र्याने सर्व मुस्लिम देशांनी इराणच्या कारवाईचे समर्थन करावे, हानियेहची हत्या करून इस्रायलने आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

इस्रायलला मुस्लिम देशांची साथ

एप्रिल महिन्यात इस्रायलने सीरियात इराणच्या वाणिज्य दूतावासानजीक हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे वरिष्ठ कमांडर जनरल मोहम्मद रजा जहेदी समवेत 7 अधिकारी मारले गेले होते. इराणने 13 एप्रिल रोजी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत इस्रायलच्या दिशेने 300 हून अधिक क्षेपणास्त्रs आणि आत्मघाती ड्रोन्स डागली होती. तर इस्रायलने अमेरिका आणि स्वत:च्या सहकाऱ्यासोबत मिळून हे हल्ले अयशस्वी ठरविले होते. त्यावेळी जॉर्डन आणि सौदी अरेबियाने देखील इस्रायलला साथ दिली होती.

इराण एकाकी पडल्याचे चित्र

31 जुलै रोजी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माइल हानियेहच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबिया आणि युएई यासारख्या प्रमुख अरब देशांनी कुठलीच कठोर टिप्पणी केलेली नाही. सौदी अरेबियाने हानियेहच्या हत्येला इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन ठरविले असले तरीही इस्रायलचा उल्लेख करणे टाळले आहे. यामुळे इराण याप्रकरणी मुस्लीम जगतातच एकाकी पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article