For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'इराणला काहीही फरक पडत नाही' अमेरिकेच्या निर्बंधानंतरही होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नवे व्यवस्थापन विनाव्यत्यय सुरुच.

04:29 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
 इराणला काहीही फरक पडत नाही  अमेरिकेच्या निर्बंधानंतरही होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नवे व्यवस्थापन विनाव्यत्यय सुरुच
Advertisement

मध्यपुर्वेत सुरु असणाऱ्या युद्धसदृश्य परिस्थितीने आता आणखी तणावपूर्ण वळण घ्यायला सुरुवात केली आहे. अमेरिका इस्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या या युद्धामुळे जगभरात तणावाचे आणि उर्जाटंचाईचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनासाठी (Strait of Hormuz) Parcian gulf strait Authority (PGSA) ची स्थापना केली.

Advertisement

अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्णयानंतर आता PGSA ने आपले काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. "वॉशिंग्टन युद्धाच्या माध्यमातून होर्मुझवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले असुन आता निर्बंधांच्या बाबतीतही तेच सिद्ध होईल".

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने PGSA वर लादलेल्या कडक निर्बंधांचा निषेध करत इराणने एक्स पोस्टवर म्हटले आहे की, "ज्या देशाचा पंतप्रधान चाचेगिरीचं समर्थन करतो अशा देशाकडून निर्बंध लादणे हे आम्ही स्वत:च्या सकारात्मक कामगिरीचे लक्षण मानतो. युद्ध आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तुम्ही होर्मुझवर नियंत्रण मिळवू शकला नाहीत ते निर्बंधाच्या माध्यमातून मिळवू शकणार नाहीत.

Advertisement

अमेरिकेचा आरोप

या पोस्टमध्ये PGSA ने पुढे म्हटले आहे की, पर्शियन गल्फ आणि ओमानच्या समुद्रात अमेरिकेने चिथावणीखोर कारवाया करुनही ही संस्था कोणतेही शत्रुत्वपूर्ण संबंध नसलेल्या जहाजांना परवानगी देईल आणि अडथळे आणणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने PGSA च्या स्थापनेनंतर जहाजांकडून खंडण्या उकळण्यासाठी आणि सगळा महसूल इस्लामिक रेव्होलुशनरी गार्डकडे वळवण्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचा आरोप इराणवर केला होता. त्यावर इराणने एक्सवर पोस्ट करुन उत्तर दिले आहे.  इराणने म्हटले आहे की आता होर्मुझमधून जाताना जहाजांना आता परवानगी घ्यावीच लागेल.

Advertisement
Tags :

.