For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणची माजिद हवाई सुरक्षा प्रणाली चर्चेत

06:22 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणची माजिद हवाई सुरक्षा प्रणाली चर्चेत
Advertisement

अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा ठरली काळ

Advertisement

इराणच्या आकाशात अमेरिकेची विमानं संकटात आहेत. इराण एकामागोमाग एक अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर निशाणा साधतोय. इराणला हे यश माजिद प्रणालीमुळे मिळत आहे. इराणने 2021 मध्ये या प्रणालीचा वापर सुरू केला होती. ही प्रणाली कमी उंचीवरून उ•ाण करणाऱ्या विमानांना ट्रॅक करते.

रडारवर नाही निर्भर

Advertisement

माजिद एक मोबाइल सुरक्षा प्रणाली असून तिला ट्रकवर जोडले जाऊ शकते. आकाशातून येणाऱ्या धोक्यांची लवकर ओळख पटवत त्यांना नष्ट करण्यास ही प्रणाली सक्षम आहे. शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना आकाशातच नष्ट करणारी ही शस्त्रास्त्र प्रणाली आहे. इराणची माजिद प्रणाली रडारवर निर्भर नाही, तर इन्फ्रारेड गायडेन्स सिस्टीमवर काम करते. शत्रूच्या विमानाला त्याच्या उष्णतेद्वारे माजिद प्रणाली ट्रॅक करते. स्टील्थ टार्गेटवरही अचूक निशाणा लावण्यास माजिद सिस्टीम सक्षम आहे. इन्फ्रारेड सेंसर्सची कक्षा 15 किलोमीटरपर्यंत आहे. माजिद प्रणाली एक बर्हिगत काशिफ-99 फेज्ड-एरे सिस्टीमसोबत येते, जे ट्रॅकिंग क्षमता वाढवून 30 किलोमीटर करते.

शोधून-शोधून करते नष्ट

माजिद सिस्टीमधून क्षेपणास्त्र डागल्यावर काही करावे लागत नाही. हे क्षेपणास्त्र स्वत:च टार्गेट शोधून नष्ट करते. ही सिस्टीम ट्रकवर लादलेली असल्याने लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येते. युद्धाच्या मैदानात वाचण्याची याची क्षमताही अधिक आहे. कमी स्तरावर उड्डाण करणाऱ्या शत्रूच्या विमानांसाठी ही प्रणाली अत्यंत धोकादायक आहे. याचा मारक पल्ला सुमारे 8-10 किमी उंचीपर्यंत आहे आणि हे 6 किलोमीटरपर्यंतच्या कनिष्ठ स्तरावर उपयुक्त असते.

कुणाविरोधात उपयुक्त?

-इराणची ही सिस्टीम ड्रोन, हेलिकॉप्टर, कमी उंचीवरून उ•ाण करणारी विमाने आणि क्रूज क्षेपणास्त्रांच्या विरोधात अत्यंत उपयुक्त आहे.

-अमेरिकेच्या ज्या विमानांना इराणने नष्ट केले आहे ती अत्यंत कमी उंचीवरून उ•ाण करत होती असे सांगण्यात येत आहे.

-माजिद सिस्टीमने अनेक उच्च क्षमता असलेले अमेरिकन आणि इस्रायली युएव्ही खासकरून एमक्यू-9 अन् हेरॉन ड्रोन नष्ट केले.

Advertisement
Tags :

.