For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला

06:54 AM Mar 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला
Advertisement

अमेरिकन तळांवर डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs : गुगल, अॅमेझॉनसह ‘टेक’ कार्यालये लक्ष्यस्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या बाराव्या दिवशी इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणने इस्रायल आणि मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs डागली आहेत. इराण अमेरिकन टेक कंपन्यांच्या कार्यालयांना आणि डेटा सेंटरला देखील लक्ष्य करू शकतो, असे इराणी मीडियाच्या अहवालात म्हटले आहे. संभाव्य लक्ष्यांच्या यादीत गुगल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आणि ओरॅकल सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

Advertisement

इराणकडून इस्रायल, दुबई आणि अबू धाबीमधील या कंपन्यांच्या कार्यालयांना आणि डेटा सेंटरला देखील लक्ष्य केले जाऊ शकते. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणला बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि जॉर्डनवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन करणाऱ्या ठरावावर मतदान होणार आहे.

मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका थाई मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. ओमानजवळ जहाजावर एक प्रक्षेपणास्त्र आदळल्यामुळे थाई नौदलाने बचावकार्य सुरू केले. थाई ध्वजधारी बल्क कॅरियर ‘मयुरी नारी’ ओमानच्या उत्तरेस सुमारे 11 नॉटिकल मैल (सुमारे 18 किमी) प्रवास करत असताना त्यावर हल्ला झाला. थाई मीडियाच्या वृत्तानुसार, जहाजावरील 20 क्रू मेंबर्सना वाचवण्यात आले आहे.

इराकच्या कुर्दिश प्रदेशात ड्रोन हल्ला

इराकच्या कुर्दिश प्रदेशात इराणने ड्रोन हल्ला केला आहे. सुलेमानियाह जवळील कुर्दिश विरोधी गट, कोमाला पार्टीच्या स्थानांना लक्ष्य करून या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला आणि इतर दोन जण जखमी झाले. इराणी कुर्दिस्तानच्या कोमाला पार्टीच्या मते बुधवारी सुलेमानियाह शहराजवळील झरग्वेझाला भागात त्यांच्या तळांवर अनेक ड्रोनने हल्ला केला. संघटनेचा एक सदस्य या हल्ल्यात ठार झाला आणि इतर दोघे जखमी झाले.

इस्रायल लेबनॉन सीमेवर लष्करी ताकद वाढवणार

इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या सीमेवरील उत्तरेकडील भागात अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, लष्करप्रमुखांनी उत्तर कमांड सेक्टरमध्ये लष्करी दल वाढवण्याचे आदेश दिले. लष्कराच्या निवेदनानुसार, दक्षिण कमांडमधील गोलानी ब्रिगेड लढाऊ पथक उत्तरेकडील भागात पुन्हा तैनात केले जाईल. सीमावर्ती भागात सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. लेबनॉनमध्ये अलिकडच्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या 570 वर पोहोचली आहे, तर 1,444 जण जखमी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.