For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचा 10 सूत्री प्रति-प्रस्ताव

06:34 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचा 10 सूत्री प्रति प्रस्ताव
Advertisement

युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या मागण्या

Advertisement

इराणने अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या उत्तरादाखल इराणने युद्धविरामाऐवजी संघर्ष कायमस्वरुपी थांबविण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या 15 सूत्री शांतता प्रस्तावाच्या उत्तरादाखल इराणने 10 सूत्री योजना मांडली आहे. इराणने यात स्वत:च्या मागील अनुभवांचा दाखला देत युद्धविराम स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या योजनेत इराणने स्वत:च्या मागण्या नमूद केल्या आहेत. यात केवळ इराणच नव्हे तर लेबनॉन आणि गाझामध्येही युद्धाची स्थायी समाप्तीची मागणी आहे. हे युद्ध पुन्हा सुरू न करण्याची हमी देखील मागण्यात आली आहे. याचबरोबर होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग तयार करणे, युद्धाने प्रभावित भागांची पुनउ&भारणी करणे आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध हटविण्याची मागणी सामील आहे.

Advertisement

हिजबुल्लाहपासून होर्मुझपर्यंत..

प्रस्तावात इराणवर पुन्हा हल्ला होणार नसल्याची हमीची मागणी करण्यात आली आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह विरोधातील इस्रायलचे हल्ले थांबविले जावेत आणि सर्व बंदी हटविण्यात यावी. याच्या बदल्यात इराण होर्मुझ सामुद्रधुनीतील मुख्य जलमार्गावरील स्वत:ची नाकाबंदी हटविणार असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. प्रस्तावानुसार होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून इराण जवळपास 20 लाख डॉलर्सचे शुल्क आकारणार आहे. हे शुल्क सामुद्रधुनीच्या दुसऱ्या हिस्स्यावर स्थित ओमानसोबत वाटले जाणार आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त सुविधा पुन्हा उभारण्यासाठी थेट भरपाई घेण्याऐवजी इराण या कमाईतील स्वत:च्या हिस्स्याचा वापर करणार आहे.

इराणच्या प्रस्तावात काय?

-इराणवरील सर्व हल्ले रोखण्याची मागणी

-सर्व निर्बंधांपासून दिलासा मिळावा

-भविष्यात पुन्हा हल्ले न करण्याची हमी

-इस्रायलचे हल्ले रोखण्याची मागणी

-पुनउ&भारणी करण्यास मदत

-होर्मुजमध्ये शिपिंगवर नियंत्रण

-20 लाख डॉलर्सचे शुल्क आकारणार

Advertisement
Tags :

.