For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणी टोळी पुन्हा सक्रिय?

06:33 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणी टोळी पुन्हा सक्रिय
Advertisement

चेनस्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहर व उपनगरात चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा इराणी टोळी सक्रिय झाली आहे का? असा संशय बळावला आहे. या घटनांमागे इराणी टोळीतील गुन्हेगारांचा सहभाग आहे की स्थानिक गुन्हेगारांचे हे कृत्य आहे? याचा तपास करण्यात येत आहे.

Advertisement

बुधवार दि. 1 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अनगोळ नाक्याजवळ अंबिका परशुराम निकम (वय 54) राहणार शास्त्राrनगर या महिलेच्या गळ्यातील सुमारे 9 लाख 18 हजार रुपये किमतीचे 68 ग्रॅम गंठण पळविले आहे. मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने हे कृत्य केले असून गुरुवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.

चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या व डोक्यावर हेल्मेट परिधान केलेल्या एका भामट्याने अंबिका यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून घेऊन पलायन केले. महिलेने आरडाओरड करताच लोक जमा झाले, त्याआधीच भामट्याने तेथून पलायन केले.

कॉलेज रोडवरही 24 सप्टेंबरला आणखी एक घटना घडली आहे. श्रीदेवी गणपत चौगुले (वय 42) राहणार कंग्राळ गल्ली या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास औषध घेऊन आपल्या आईसमवेत घरी जाताना ऑटोरिक्षातून आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेऊन पलायन केले आहे. चेन तुटल्याने एक तुकडा श्रीदेवी यांच्याकडेच राहिला तर 3 ग्रॅमचा तुकडा भामट्याच्या हातात सापडला. गेल्या आठवड्यात माळमारुती परिसरातही चेनस्नॅचिंगची घटना घडली होती. या घटनांमागे स्थानिक गुन्हेगारांची टोळी सक्रिय आहे की इराणी टोळी? याचा तपास करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.