जमिनीखाली प्रतीक्षेत इराणचा विध्वंसक
गुप्त भुयारात दिसले शाहेद ड्रोन
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) स्वत:च्या ड्रोन क्षमतांमध्ये नवा स्तर दाखवत शाहेद ड्रोन टनेल नेटवर्कचा खुलासा केला आहे. अलिकडेच इराणने दुबईला लक्ष्य करत शाहेद साखळीचे लोइटरिंग म्युनिशन ड्रोन पाठविले होते. या ड्रोन्सनी दुबईत मोठे नुकसान घडवून आणले आहे.
शाहेद ड्रोनची शक्ती
शाहेद ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्या याचे स्वस्त उत्पादन आणि तैनात आहे. तसेच हा आकाराच्या तुलनेत अत्याधिक प्रभावी अस्त्र ठरतो. याचमुळे हा ड्रोन रोखण्यासाठी इराणच्या विरोधकांना महाग अँटी-ड्रोन क्षेपणास्त्र वापरावे लागते. बहुतांश लढाऊ ड्रोन रेंज आणि वजन मर्यादांच्या बंधनात असतात. शाहेद ड्रोन या मर्यादा पार करत ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्राचे संयोजन तयार करतो. शाहेद-136 ड्रोन 2,500 किलोमीटरपर्यंतचे अंतर गाठू शकतो.
टनेल नेटवर्क आणि रणनीति
इराणने या ड्रोन्सना स्वत:च्या क्षेत्राच्या अत्यंत आतील हिस्स्यांमध्ये प्रक्षेपित केल्याने त्यांचा शोध लावणे अवघड अन् संचालन सुरक्षित ठरले आहे. याचा पेलोड आणि रेंज क्षमताही प्रभावशाली आहे. शाहेद ड्रोन अत्यंत कमी उंचीवर उडतो आणि मूलभूत पिस्टन प्रोपल्शन सिस्टीमने संचालित होतो. छोटी रडार सिग्नेचर आणि प्रतिकूल भौगोलिक क्षेत्रांमध्ये उ•ाण यामुळे याचा माग काढणे अवघड ठरते.
शाहेद-136 ची वैशिष्ट्यो...
-इराणचा शाहेद-136 ड्रोन स्वत:ची कक्षा, पेलोडक्षमता आणि स्वस्त डिझाइनमुळे क्षेत्रीय सैन्य तणावात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
-हा ड्रोन जवळपास 2000-2500 किमीपर्यंतचे अंतर गाठू शकतो आणि 40-50 किलोग्रॅप स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे.
-याचा सरासरी वेग 180-200 किलोमीटर प्रतितास इतका आहे, हा वेग याला मंद परंतु टिकाऊ स्वरुप मिळवून देतो.
-3000-4000 मीटरच्या उंचीवर उ•ाण आणि कमी रडार सिग्नेचरमुळे याचा शोध लावणे अवघड ठरते.
-स्वस्त निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या क्षमतेमुळे याला स्वॉर्म अटॅकसाठी वापरले जाऊ शकते.
-अनेक ड्रोन एकाचवेळी लाँच होत सैन्यतळ, पायाभूत प्रकल्प आणि नागरी क्षेत्रांमध्ये प्रचंड नुकसान घडवून आणू शकतात.