For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणी विमानाचे नुकसान

06:04 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणी विमानाचे नुकसान
Advertisement

विमान 1 एप्रिल रोजी नवी दिल्लीत येणार होते

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान, नवी दिल्ली

इराणमधील मशहद विमानतळावर तैनात असलेले ‘महान एअर’चे एक विमान अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात नुकसानग्रस्त झाले आहे. वृत्तानुसार, हे विमान मानवतावादी मदत मोहिमेसाठी मदत साहित्य घेऊन जाण्यासाठी नवी दिल्लीला पोहोचणार होते. ते 1 एप्रिल रोजी पहाटे 4:00 वाजता दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्याच्यावर अमेरिकेने हल्ला केल्याचे समजते. या घटनेमुळे देशातील नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे.

Advertisement

नुकसानग्रस्त झालेले विमान भारतातून इराणला औषधांसह 11 टन मानवतावादी मदत घेऊन जाणार होते. यापूर्वीच्या मदत खेपांसाठी भारतीय विमानांचा वापर केला गेला नव्हता. भारताने इराणला पहिली मदत खेप 18 मार्च 2026 रोजी पाठवली होती. ही मदत दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे.

Advertisement
Tags :

.