For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Iran internet blackout | इराण-अमेरिका युद्धविराम ; पण इराणमधील इंटरनेट बंदी हटणार का?

03:53 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
iran internet blackout   इराण अमेरिका युद्धविराम   पण इराणमधील इंटरनेट बंदी हटणार का
Advertisement

                                                      इराणमध्ये 912  तासांपासून इंटरनेट बंद;

Advertisement

इराण आणि अमेरिका पुढील २ आठवड्यांसाठी युद्धविरामावर सहमत झाले आहेत. परंतु याचा फायदा सर्वसामान्य इराणी जनतेला मिळणार का?, इराणमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट ३९ दिवसांपासून कायम आहे. नेटब्लॉक्सच्या डाटानुसार इराणची सामान्य जनता इंटरनेटपासून पूर्णपणे दूर असून तिला बाहेरील जगाशी जोडून घेणे अशक्य ठरले आहे.इराणमध्ये हे आतापर्यंतचे सर्वात मोठे इंटरनेट ब्लॅकआउट ठरले आहे.

इराणची जनतामागील ९१२ तासांपासून इंटरनेट सेवेपासून वंचित आहे. केवळ डोमेस्टिक डिजिटल सर्व्हिस आणि इंट्रानेटची सुविधा पुरविली जात आहे.इराणमधील डोमेस्टिक डिजिटल सर्व्हिस अन् इंट्रानेटडोमेस्टिक डिजिटल सर्व्हिस ही स्थानिक स्तरावर तयार करून लोकांना वापरण्यासाठी पुरविली जाते.

Advertisement

या इंटरनेटमध्ये लोकांनालिमिटेड अॅक्सेस मिळतो, म्हणजेच सरकारकडून मंजुरी असलेले अॅप्स आणि वेबसाइट्सच लोक वापरू शकतात. याचबरोबर इंटरनेटवर सरकारचे पूर्ण नियंत्रण राहते आणि ते लोकांच्या इंटरनेट हालचालींवर नजर ठेवू शकते.ग्लोबल इंटरनेट इराणमध्ये ग्लोबल इंटरनेटला सामान्य लोकांसाठी कायमस्वरुपी बंद केले जाण्याचा अनुमान अनेक माध्यमांनी व्यक्त केला आहे. इराणच्या जनतेला स्थानिक स्तरावर तयार इंटरनेट चालविण्यास मिळाले, ज्यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण राहण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.