महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आर्मेनियाला इराण देणार किलर शहीद ड्रोन्स

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेहरान : इराण आणि आर्मेनियाने 500 दशलक्ष डॉलर्सच्या एका मोठ्या शस्त्रास्त्र करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या या कराराचे स्वरुप गुप्त ठेवण्यात आले आहे. इराण आता आत्मघाती ड्रोन्स आर्मेनियाला पुरविणार आहे. आर्मेनियाचा अझरबैजानसोबतचा तणाव वाढला आहे. 1990 च्या दशकात सोव्हियत महासंघाच्या पतनानंतर आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात दोन युद्धं झाली आहेत. आर्मेनिया हा भारताचा मित्रदेश आहे. तर अझरबैजान हा पाकिस्तानशी जवळीक असणारा देश आहे. अझरबैजानने 2020 मध्ये आर्मेनियाच्या एका मोठ्या हिस्स्यावर कब्जा केला आहे.

Advertisement

तर मागील वर्षी अझरबैजानच्या सैन्याने नागोर्नो-काराबाखच्या क्षेत्रावरही कब्जा केला. तर या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा इराणने वारंवार दिला आहे. इराणकडून शहीद ड्रोन प्रकारातील शहीद 136, शहीद 129, शहीद 197, मोहजर ड्रोन आणि अरमान एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम पुरविण्यात येणार आहे. इराण आणि आर्मेनियाच्या विदेश तसेच संरक्षण मंत्रालयांकडून यासंबंधी कुठलीच टिप्पणी करण्यात आलेली नाही. इराण आणि आर्मेनियाने गुप्तचर सहकार्य, घनिष्ठ सैन्यसंबंध, प्रशिक्षण आणि आर्मेनियाच्या भूमीवर तळांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्मेनियाने 2020 च्या तुलनेत 2024 मध्ये संरक्षण खर्च 81 टक्क्यांनी वाढविला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article