For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण करणार आठ सेतूंवर हल्ला

06:04 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराण करणार आठ सेतूंवर हल्ला
Advertisement

अमेरिकेला प्रत्युत्तर अरब देशांचे सेतू पाडून देणार

Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणचा सर्वात मोठा सेतू पाडविल्यामुळे संतप्त झालेल्या त्या देशाने आता अरब देशांमधील आठ महत्वाचे सेतू पाडविण्याची योजना सज्ज केली आहे. या देशांमधील मुख्य सेतूंची सूचीच इराणने प्रसिद्ध केली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणचा कराज येथील सेतू गुरुवारी नष्ट केला होता. आता या घटनेचा बदला इराण अमेरिकेचे मित्र असलेल्या देशांवर घेणार आहे. पाडविणार असलेल्या सेतूंची छायाचित्रेही इराकडून प्रसिद्ध केली गेली आहेत.

Advertisement

या सूचीत कुवेत येथील शेख जाबेर अल् अहमद अल् सबा नामक सागरी सेतू आहे. तसेच राजे फहद नामक सौदी अरेबिया आणि बहारीन यांना जोडणारा सेतूही पाडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीतील शेख झायेद सेतू आणि शेख खलिफा सेतू यांचाही समावेश इराणने सूचीत केलेला आहे. तसेच राजे हुसेन सेतू, दामिया सेतू आणि अब्दुन सेतू हे जॉर्डनमधील सेतूही इराणच्या या योजनेमुळे धोक्यात आले आहेत, अशी माहिती त्या देशांच्या प्रशासनाने दिली.

अमेरिका-इस्रायलचा आघात

अमेरिका आणि इस्रायलच्या विमानांनी गुरुवारी पहाटे इराणच्या कराज येथे असलेल्या आणि इराणसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सेतूवर आघात केला होता. या सेतूचे निर्माणकार्य अद्यापी केले जात होते. हा सेतू अमेरिकेच्या हल्ल्यात नष्ट झाला आहे. नष्ट झालेल्या सेतूची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

एफ-15 विमान पाडल्याचा दावा

इराणवर हल्ला करण्यासाठी आलेले अमेरिकेचे एक एफ-15 विमान पाडविण्यात आले आहे, असा दावा इराणकडून करण्यात आला आहे. या विमानाचा चालक इराणमध्येच पडला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. अमेरिकेने अद्याप या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. इराणच्या एका वृत्तसंस्थेने हा चालक इराणच्या सैनिकांच्या हाती लागल्याचेही वृत्त प्रसिद्ध केले होते. तथापि, या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. इराणचा दावा खरा असेल, तर हे या युद्धात पडलेले अमेरिकेचे चौथे विमान ठरणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

होर्मुझच्या टोलनाक्यावर अमेरिकेचा हल्ला

तेलवाहक आणि वायूवाहक नौकांकडून टोल वसूल करण्यासाठी इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत स्थापन केलेल्या टोलनाक्यावर अमेरिकेच्या विमानांनी हल्ला केला आहे. हा टोलनाका इराणच्या केशम या द्वीपावर आहे. या द्वीपालाच लक्ष्य बनविण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या या हल्ल्याची छायाचित्रे युरोपियन महासंघाच्या उपग्रहाने चित्रीत केली असून ती प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या हल्ल्यामुळे इराणला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केशम द्वीपावरील बहमन नामक व्यापारी बंदराची या हल्ल्यामुळे मोठी हानी झाली आहे. तसेच दोहा मत्स्यघाटाचीही काही प्रमाणात हानी झाली आहे. 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या दिवसांमध्येही या  भागात अमेरिका आणि इस्रायल यांनी हल्ले केलेले आहेत, अशी माहिती आहे.

इराणसाठी महत्वाची बेटे

होर्मुझ सामुद्रधुनीत असणारी लास्क आणि केशम ही दोन द्वीपे किंवा बेटे इराणसाठी अत्यंत महत्वाची मानली जातात. या द्वीपांच्या आधारानेच इराण या सामुद्रधुनीतून होणाऱ्या नौका वाहतुकीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. या दोन द्वीपांमध्ये एक अरुंद सागरी मार्ग आहे. या मार्गाला ‘लास्क-केशम’ वाहिनी असे संबोधले जाते. केशम या द्वीपावर इराणचे महत्वाचे व्यापारी बंदरही आहे. या बंदरावरुन इराणचा मोठा तेलव्यापार होत असतो. या द्वीपांची किती प्रमाणात हानी झाली आहे, या संबंधी अद्याप नेमकी माहिती इराणकडून देण्यात आलेली नाही.

परस्परांवर हल्ल्यांच्या योजना

ड अमेरिकेने कराज येथील सेतूवर केलेल्या हल्ल्याचा इराण सूड घेणार

ड इराणच्या दोन महत्वाचा द्वीपांवर अमेरिका, इस्रायलचे विमान आघात

ड होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणचा टोलनाका अमेरिकेकडून उध्वस्त

ड अमेरिकेचे एक एफ-15 विमान पाडल्याचा इराणने केला आहे दावा

Advertisement
Tags :

.