For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणला चहुबाजूने घेराव, अमेरिकेचे 50 हजार सैनिक तयार

06:22 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणला चहुबाजूने घेराव  अमेरिकेचे 50 हजार सैनिक तयार
Advertisement

इराण युद्ध प्रतिदिन नवनवे वळण घेताना दिसून येत आहे, एकीकडे इराण झुकण्यास तयार नाही तर अमेरिकेकडूनही कुठलाच आशेचा किरण दिसून येत नाही. याचदरम्यान मध्यपूर्वेत अमेरिकेच्या सैनिकांची संख्या 50 हजाराच्या पार पोहोचली आहे. हे प्रमाण सामाध्य दिवसांच्या तुलनेत 10 हजाराने अधिक आहे. 2500 मरीन आणि 2500 नौसैनिकांच्या नव्या तुकड्या दाखल झाल्याने भागात अमेरिकेकडून होणारा घेराव मजबूत झाला असून कुठल्याही क्षणी काहीही घडु शकते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणसोबत एका महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धात पुढील पावलाबद्दल निर्णय घेऊ शकतात. यात रणनीतिक बेटांवर कब्जा करण्याची योजनाही सामील असू शकते.

Advertisement

अमेरिकेच्या सैन्याच्या 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनचे 2000 पॅराट्रॅtपर्स देखील इराणवर हल्ला करता येईल इतपत अंतरावर तैनात करण्यात आले आहेत. ही सैन्य जमवाजमव होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला करणे आणि इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आली आहे. तर इराणसारख्या मोठ्या देशावर कब्जा करण्यासाठी 50 हजार सैनिकांची तैनात अत्यंत कमी असल्याचे सैन्याशी निगडित तज्ञ सांगत आहेत. सध्या अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र खार्गसमवेत 90 हून अधिक सैन्यतळांवर बॉम्बवर्षाव केला आहे.

होर्मुझ मार्ग खुला करण्याचे आव्हान

Advertisement

जगाचा सुमारे 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा जलमार्ग इराणच्या हल्ल्यांमुळे जवळपास बंद झाला आहे. ट्रम्प प्रशासन या मार्गाला पुन्हा सुरक्षित करण्यासाठी कुठलेही बेट किंवा भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकते. 31 व्या मरीन एक्सपीडिशनरी युनिटच्या सैनिकांना अशाचप्रकारच्या  कठिण सामरिक अभियानासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. पेंटागॉनने अलिकडेच 2 हजार पॅराट्रूपर्सना मध्यपूर्वेत पाठविले असून त्यांचे लोकेशन सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. या सैनिकांचा वापर उत्तर पर्शियन सागरातील इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र खार्ग बेटावर कब्जा करण्यासाठी केला जाऊ शकतो असे जाणकारांचे मानणे आहे. मरीन कमांडेंसोबत मिळून हे पॅराट्रूपर्स जमिनीवर मोठ्या अभियानाला मूर्त रुप देऊ शकतात.

आतापर्यंत कुठलीच थेट चर्चा नाही

पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त यासारख्या मध्यस्थांद्वारे पडद्याआडून प्रयत्न सुरू असूनही अमेरिका आणि इराण दरम्यान आतापर्यत कुठलीच थेट चर्चा झालेली नाही. तर सैन्य तयारी प्रक्रियेचा हिस्सा आहे. कमांडर-इन-चीफला अधिकाधिक पर्याय देण्यासाठी तयारी करणे पेंटागॉनचे काम आहे. याचा अर्थ अध्यक्षांनी कुठला निर्णय घेतला आहे असा होत नाही असे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी म्हटले आहे.

 

अमेरिका अडकून पडणार

इराणकडे शिया मिलिशियांचे पूर्ण नेटवर्क असून ते इराक, सीरिया आणि लेबनॉनपर्यंत फैलावले आहे. अमेरिकेचे सैनिक इराणच्या भूमीवर उतरल्यास हे मिलिशिया चहुबाजूने हल्ला करू शकतात. अमेरिका इराणवर आकाशातून हल्ले करू शकतो, परंतु त्याच्या भूमीवर उतरणे मोठी चूक ठरेल. इराणचा भूगोल, क्षेपणास्त्रs, ड्रोन्स आणि सागरी शक्ती अमेरिकेला दीर्घकाळापर्यंत गुंतवून ठेवेल असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

वापसीचा मार्ग किती अवघड?

अमेरिकेने सैन्य अभियान सुरू केल्यास वापसी करणे अत्यंत अवघड ठरेल. इराणचे सरकार कोसळल्यास तेथे गृहयुद्ध सुरू होऊ शकते. वेगवेगळे गट परस्परांमध्ये लढू लागतील आणि अमेरिकेला तेथे अडकून पडावे लागेल. तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि आखाती देश प्रभावित होतील असे तज्ञांचे सांगणे आहे. चीन-रशिया यासारखे देश अमेरिकेच्या विरोधात उभे ठाकू शकतात. वापसीचा खर्च इराकपेक्षाही अधिक असेल, हजारो सैनिक, अब्जावधी डॉलर्स आणि अनेक वर्षे लागू शकतात असेही त्यांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.