इराणने दुसरे एफ-35 पाडविले
वैमानिक वाचला नसावा अशी टिप्पणी
इराणने पुन्हा एकदा अमेरिकेचे शक्तिशाली एफ-35 स्टील्थ फायटर जेट पाडविल्याचा दावा केला आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी अमेरिकेचे दुसरे एफ-35 लढाऊ विमान नष्ट पेल असून त्याचा वैमानिक गंभीर जखमी झाला असल्याने वाचण्याची शक्यता कमी असल्याचा दावा इराणच्या मेहर या वृत्तसंस्थेने केला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेन सेंट्रल कमांडने याविषयी कुठलेच वक्तव्य केलेले नाही.
इराणी हवाई सुरक्षा प्रणालीकडून लक्ष्य
मध्य इराणच्या क्षेत्रात एफ-35 स्टील्थ फायटरला पाडविण्यात आले आहे. इराणच्या हवाई सुरक्षा प्रणालीकडून हे अत्याधुनिक विमान लक्ष्य करण्यात आले. हे लढाऊ विमान ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्स लेकनहीथशी निगडित एका स्क्वाड्रनचा हिस्सा होते असा दावा इराणच्या खतम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने केला आहे.
यापूर्वीही इराणकडून टार्गेट
इराणने दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकन एफ-35 लायटनिंग विमानावर हल्ला केल्याचा दावा केला होता. एफ-35 लढाऊ विमान इराणच्या आकाशात युद्धमिशनवर असताना त्याला आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. विमान सुरक्षितपणे उतरले असल्याचा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी केला होता.
एफ-35 च्या दबदब्याला धोका
एफ-35 ला अमेरिकेच्या सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली विमानांपैकी एक मानले जाते. अशास्थितीत इराणचा दावा खरा असल्यास अमेरिकेच्या 5 व्या पिढीच्या स्टील्थ फायटर जेटच्या वर्चस्वाला मोठा झटका बसणार आहे. इराण विरोधातील संघर्षात अमेरिका आणि इस्रायल दोन्ही देश एफ-35 लढाऊ विमानांचा वापर करत आहेत. या विमानाची किंमत 10 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे.