महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराणचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्रहल्ला

06:44 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीमापार घुसून कारवाई : दहशतवाद्यांचे अ•s उद्ध्वस्त, पाककडून तीव्र निषेध

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

इराणच्या लष्कराने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानमधील बलुच दहशतवादी गट जैश-अल-अदलच्या दोन प्रमुख तळांवर हवाई हल्ले केले. इराक आणि सीरियामध्ये हवाई हल्ले केल्यानंतर एका दिवसानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ले केले. बलुच दहशतवादी गटाच्या दोन प्रमुख अ•dयांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला करून ते नष्ट केल्याचे इराणच्या राज्य माध्यमांनी सांगितले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने तीव्र निषेध व्यक्त केला असून भारतानेही सावध भूमिका घेतली आहे.

इराणच्या लष्कराने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या भागात हल्ला केला. या भागात जैश-अल-अदलचा सर्वात मोठा तळ होता. इराणने केलेल्या बेछूट हल्ल्यात दोन निष्पाप मुले मारली गेली, तर अन्य तिघे जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत एक निवेदन जारी केले आहे. इराणने केलेल्या हवाई हद्दीच्या उल्लंघनाचा पाकिस्तान तीव्र निषेध करत असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच अशाप्रकारे हल्ला करणे हे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून ते पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचेही म्हटले आहे. या हल्ल्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही निवेदनात म्हटले आहे. बलुच भागातील सर्व देशांसाठी दहशतवाद हा एक समान धोका असून त्यासाठी समन्वित कारवाईची गरज आहे. अशी एकतर्फी कारवाई चांगल्या शेजारी संबंधांशी सुसंगत नाही. अशा कृतींमुळे द्विपक्षीय संबंध आणि विश्वास यांना बाधा पोहोचू शकते, असेही पाकिस्तान प्रशासनाने म्हटले आहे. याचदरम्यान रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयात पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आता इराणला कसे प्रत्युत्तर द्यायचे हा या बैठकीचा अजेंडा होता.

पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने उत्तर इराकी शहर इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. सीरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवरही गार्ड्सने कारवाई केली होती. आयएसचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही वापर केला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने या हल्ल्याची कबुली दिली होती.

‘जैश-अल-अदल’ हा दहशतवादी गट

जैश-अल-अदलची स्थापना 2012 मध्ये झाली असून त्याला इराण एक दहशतवादी संघटना मानते. हा एक सुन्नी दहशतवादी गट असून तो इराणच्या दक्षिण-पूर्व प्रांत सिस्तान-बलुचिस्तानमध्ये आहे. जैश-अल-अदलने गेल्या काही वर्षांत इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये सिस्तान-बलुचिस्तानमधील पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी या गटाने स्विकारली होती. या हल्ल्यात 11 पोलीस ठार झाले होते.

इराणमधील घटनात 100 जणांचा मृत्यू

गेल्या आठवड्यात इराणमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोटामुळे इस्रायल-हमास युद्धाचा धोका वाढला आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन अरब देशांना भेट देऊ शकतात. इराण आणि हमासने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, अमेरिकेने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानला चीनकडून मदतीची आशा

पाकिस्तानात घुसून इराणच्या लष्कराने जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तान नाराज झाला आहे. इराणने ज्या भागात हवाई हल्ला केला आहे तेथे चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे अनेक प्रकल्प उभारत आहेत. मात्र, या हल्ल्याचा थेट परिणाम या प्रकल्पांवरही झाला आहे. त्यामुळेच आता पाकिस्तान चीनवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आशाळभूत नजरेने चीनकडे पाहत आहे. पाकिस्तानला चीनकडून कितीही अपेक्षा असल्या तरी चीन या प्रकरणात मुळीच मदत करणार नाही, असे संरक्षण तज्ञांचे मत आहे. सध्या पाकिस्तानातील निवृत्त लष्करी अधिकारी आणि स्थानिक लोकांनी पाकिस्तानच्या लष्कर आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुऊवात केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article