For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण-इस्रायल तणावाचा भारतीय बाजाराला धक्का

06:23 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराण इस्रायल तणावाचा भारतीय बाजाराला धक्का
Advertisement

सेन्सेक्स 456 तर निफ्टी 124 अंकांनी प्रभावीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारातील सलग तिसरे सत्र व चालू आठवड्यातील दुसरे सत्र मंगळवारी घसरणीसह बंद झाले आहे. कारण जागतिक पातळीवरील इराण व इस्रायल यांच्यामधील युद्धजन्य स्थिती, विक्रीच्या परिणामामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले आहेत.

Advertisement

आयटी क्षेत्रात सर्वाधिक विक्रीमुळे बाजार प्रभावीत राहिला आहे. मंगळवारीही जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती राहिली होती. तसेच विदेशी फंड काढून घेण्यात आल्यामुळे गुंतवणूकदारही काळजीत राहिल्याचे दिसून आले. जवळपास तीन दिवसांमध्ये सेन्सेक्स 2,094.47 अंकांनी घसरणीत राहिला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 456.10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,943.68 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 124.60 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,147.90 वर बंद झाला आहे.

दरम्यान बाजारात एनएसईत स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. तर मिडकॅपचा निर्देशांक हा चढउतारामध्ये राहिला होता.

सेन्सेक्समधील समभागांमध्ये इन्फोसिस, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये मंगळवारी टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग हे लाभासह बंद झाले आहेत.

जागतिक संकेत

जागतिक पातळीवर आशियातील बाजारात सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग काहीसे प्रभावीत राहिले.  युरोपीयन बाजार नुकसानीसह बंद झाला. अमेरिकन बाजार घसरणीत होता. तेल ब्रेंट क्रूड 0.26 टक्क्यांनी घसरुन 89.87डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Advertisement
Tags :

.