महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराणचा पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

06:29 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहशतवादी कमांडर इस्माईल शाहबक्ष ठार

Advertisement

► वृत्तसंस्था/ तेहरान, इस्लामाबाद

Advertisement

इराणने पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत झालेल्या सशस्त्र चकमकीत जैश अल-अदल या दहशतवादी गटाचा वरिष्ठ कमांडर इस्माईल शाहबक्ष आणि त्याच्या काही साथीदारांना ठार केल्याचा दावा इराणच्या लष्करी दलांनी केला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर एक महिन्यानंतर इराणच्या लष्कराने सशस्त्र संघर्षात पुन्हा एकदा ‘जैश अल-अदल’ या दहशतवादी गटावर हल्ला केला.

2012 मध्ये स्थापन झालेली ‘जैश अल-अदल’ला इराणने ‘दहशतवादी’ संघटना म्हणून घोषित केली आहे. हा एक सुन्नी अतिरेकी गट असून तो इराणच्या आग्नेय प्रांत सिस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत ‘जैश अल-अदल’ने इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत.

डिसेंबरमध्ये ‘जैश अल-अदल’ने सिस्तान-बलुचिस्तानमधील एका पोलीस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यामध्ये किमान 11 पोलीस कर्मचारी मारले गेले होते. गेल्या महिन्यात एकमेकांच्या प्रदेशात ‘दहशतवादी गटां’वर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्यानंतर पाकिस्तान आणि इराणने सुरक्षा सहकार्य वाढविण्यास परस्पर सहमती दर्शवली होती. मात्र, नुकताच झालेला हल्ला उलटाच संकेत देत आहे. तेहरान आणि इस्लामाबादने ‘दहशतवादी गटा’ला लक्ष्य करत एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. इराणने 16 जानेवारीच्या रात्री उशिरा पाकिस्तानमध्ये ‘जैश अल-अदल’चे दोन तळ नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले. या हल्ल्यात दोन मुले ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article