आयक्यूचा नवा 15 आर स्मार्टफोन लाँच
7,600 एमएएचची दमदार बॅटरी : किंमत 44,000 रु. पुढे
नवी दिल्ली :
आयक्यू कंपनीचा नवा 15 आर स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. 44,000 रु. च्या पुढे या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 7,600 एमएएच क्षमतेची बॅटरी यामध्ये दिली जाणार आहे.
सदरचा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चीपसेट्ससह येणार असून याला 6.59 इंचाचा अमोलेड डिस्प्ले स्क्रिन येणार आहे. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 45,000 रु. 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज फोनची किंमत 48,000 रु. तर 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 53,000 रु. इतकी असणार आहे. डार्क नाईट, ट्रिम्फ सिल्व्हर या दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन येणार असून 3 मार्चपासून आयक्यूच्या अधिकृत संकेतस्थळावर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन व इतर रिटेल स्टोअर्सवर फोनची विक्री सुरु होणार आहे. सुरुवातीला आगाऊ बुक करणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर 4000 रु. सवलत मिळणार आहे.
कॅमेरा
कॅमेऱ्याचा विचार करता यामध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी लाईट 700 व्ही प्रायमरी सेन्सर कॅमेरा तसेच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्राव्हाईल्ड लेन्ससहचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. सेल्फीकरीता 32 मेगापिक्सेलचा दमदार कॅमेरा देण्यात आला आहे. 7600 एमएएच क्षमतेची बॅटरी तसेच 100 डब्ल्यूचा व्हायर्ड चार्जर दिला जाणार आहे.