For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर विभागाच्या डावात इक्बालचे अर्धशतक, कविरप्पाचे 4 बळी

07:26 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तर विभागाच्या डावात इक्बालचे अर्धशतक  कविरप्पाचे 4 बळी
Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

Advertisement

2026 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरु झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी कवीरप्पाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण विभागाने उत्तर विभागाला पहिल्या डावात 195 धावांवर रोखले. त्यानंतर दिवस अखेर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 2 बाद 40 धावा जमविल्या. सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविताना 12 गडी बाद केले.

या सामन्यात उत्तर विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण विभागाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर उत्तर विभागाचे फलंदाज झटपट बाद झाले. सलामीचा फलंदाज कमरान इक्बाल तसेच कर्णधार वाधवान यांच्या समयोचीत फलंदाजीमुळे उत्तर विभागाला 195 धावांपर्यंत मजल मारता आली. कमरान इक्बालने 182 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 76 तर वाधवानने 3 चौकारांसह 35 तसेच डुसेजाने 5 चौकारांसह 23, अब्दुल समदने 1 षटकार, 2 चौकारांसह 16, अर्शदीप सिंगने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. दक्षिण विभागातर्फे व्ही. कवीरप्पाने 66 धावांत 4 तर निदेश आणि त्यागराजण यांनी प्रत्येकी 2, सैतेजा आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. चहापानानंतर काही वेळातच उत्तर विभागाचा पहिला डाव समाप्त झाला.

Advertisement

त्यानंतर दक्षिण विभागाने दिवस अखेर पहिल्या डावात 18 षटकात 2 बाद 40 धावा जमविल्या. उत्तर विभागाच्या कंबोजने सलामीच्या रिकी भूईचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर ब्रारने शेख रशिदला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. नारायण जगदीशन 6 चौकारासह 34 धावांवर खेळत आहे. कंबोज आणि ब्रार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - उत्तर विभाग प. डाव 59.1 षटकात सर्वबाद 195 (कमरान इक्बाल 76, वाधवान 35, दुसेजा 23, समद 16, अवांतर 15, कवीरप्पा 4-66, निधेश व त्यागराजण प्रत्येकी 2 बळी, सतेजा आणि श्रेयस गोपाल प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.