For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

या आठवड्यात विविध कंपन्यांचे आयपीओ होणार गुंतवणूकीसाठी खुले

06:25 AM Oct 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
या आठवड्यात  विविध कंपन्यांचे आयपीओ होणार गुंतवणूकीसाठी खुले
Advertisement

या आठवड्यात 8 कंपन्यांचे आयपीओ असणार असून 2 मेनबोर्ड गटात होणार सादर

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

12 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या आठवड्यात विविध कंपन्यांचे आयपीओ सादर होणार आहेत. यामध्ये 8 कंपन्यांचे आयपीओ असणार असून यातील 2 मेनबोर्ड गटात सादर केले जातील. याशिवाय आधीच खुला झालेला एकही आयपीओ या आठवड्यात नसेल. या आठवड्यात झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग, बोनफिग्लीयोली ट्रान्स्मीशन, टोनबो इमेजिंग इंडिया यांच्यासह एचडी फायर प्रोटेक्ट, फ्यूजन सीएक्स व सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजीस यांचे आयपीओ सादर होणार आहेत.

Advertisement

पाहुया कोणत्या कंपन्यांचे आयपीओ बाजारात खुले होणार आहेत.

एचडी फायर प्रोटेक्ट : या कंपनीचा आयपीओ 13 ऑक्टोबरला खुला होणार असून 15 ऑक्टोबर रोजी गुंतवणूकीसाठी बंद होणार आहे. कंपनी या आयपीओतून जवळपास 712 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. यासाठी आयपीओची इशु किमत 258 ते 271 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 55 समभागांचा समावेश असणार आहे. कंपनीचे समभाग एनएसई व बीएसईवर 21 ऑक्टोबर रोजी सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

रविता इंजिनियरिंग सर्व्हिसेस : सदरचा आयपीओ 13 ऑक्टोबरला खुला होऊन 15 रोजी बंद होणार आहे. इशु किंमत 105 ते 112 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओतून कंपनी 116 कोटी रुपये उभारणार आहे. एका लॉटमध्ये 1200 समभागांचा समावेश असणार असून एनएसई एसएमएईवर समभाग 21 ऑक्टोबरला सुचीबद्ध होऊ शकतात.

वैभव व्यापार : सदरची कंपनी आयपीओतून 42 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओकरीता इशु किमत 51 ते 54 रुपये प्रति समभाग ठेवण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 2000 समभाग असणार असून आयपीओ 13 ऑक्टोबर खुला होऊन 15 ऑक्टोबरला बंद होणार आहे. एनएसई एसएमईवर समभाग 21 ऑक्टोबर रोजी सुचीबद्ध होऊ शकतो.

फ्युजन सीएक्स : कंपनी आयपीओतून 702 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. 14 ऑक्टोबरला आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 16 ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. एका लॉटमध्ये 51 समभाग असणार असून 275 ते 289 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत निश्चित करण्यात आली आहे. एनएसई व बीएसईवर समभाग 22 ऑक्टोबर रोजी सुचीबद्ध होऊ शकतात.

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस: सदरची कंपनी आयपीओतून 5 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. नवे समभाग सादर करण्यासोबत ऑफर फॉर सेलअंतर्गत रक्कम उभारणी कंपनी करणार आहे. नव्या समभाग सादरीकरणातून मिळणारी रक्कम थेट कंपनीला मिळेल. 15 ऑक्टोबरला आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 19 ऑक्टोबरला बंद होईल.

बोनफिग्लीयोली ट्रान्स्मीशन : कंपनीचा आयपीओ 15 ऑक्टोबरला खुला होणार असून 19 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 2500 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलअंतर्गत असणार आहे.

टोनबो इमेजिंग इंडिया : कंपनी आयपीओतून 1500 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलअंतर्गत असेल. ज्यात 1.22 कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे.

सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजीस : कंपनीचा आयपीओ 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत गुंतवणूकीकरीता उपलब्ध असणार आहे. मेन बोर्डवर आयपीओ खुला होणार असून आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलअंतर्गत असणार आहे. 2.76 कोटी समभाग विक्रीकरीता उपलब्ध असतील.

Advertisement
Tags :

.