महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स’चा आयपीओ खुला

06:32 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

28 मार्चपर्यंत बोली लावण्याची संधी 

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

बांधकाम आणि विकास यांच्याशी संबंधीत असणारी कंपनी एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवारपासून खुला झाला आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओसाठी 26 मार्च ते 28 मार्चपर्यंत बोली लावू शकतात.

कंपनीचे समभाग हे मुंबई शेअरबाजारात 3 एप्रिल रोजी नोंदणीकृत होणार आहेत. या आयपीओच्या मदतीने कंपनी जवळपास 130.20 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे. हा संपूर्णपणे नवीन आयपीओ असल्याने कंपनी यासाठी तब्बल 6,200,000 नवीन समभाग सादर करणार असल्याची माहिती आहे.

किमान व कमाल किती गुंतवणूक?

सदरच्या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉट म्हणजेच 70 समभागांसाठी अर्ज करता येईल. कंपनीने आयपीओ प्राईस ब्रँड 200 ते 210 रुपये प्रति समभाग निश्चित केली आहे. आयपीओच्या 210 च्या वरील प्राईस ब्रँडवर 1 लॉटसाठी अर्ज करायचा झाल्यास मात्र जवळपास 14,700 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article