महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चाथा फूड्स यांचा आयपीओ येणार

06:05 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

19 मार्चला होणार खुला : 34 कोटी रुपयांची उभारणी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

प्रक्रिया खाद्य बनवणारी चाथा फूड्स यांचा आयपीओ 19 मार्च रोजी खुला होणार आहे. सदरच्या आयपीओ अंतर्गत 34 कोटी रुपयांची उभारणी कंपनी करणार असून आयपीओ 21 मार्चपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी आयपीओ अंतर्गत 59.62 लाख नवे समभाग बाजारात सादर करणार आहे. 21 मार्च रोजी सबक्रीप्शनसाठी हा आयपीओ बंद होणार असून कंपनीचे समभाग शेअरबाजारामध्ये 27 मार्च रोजी सूचीबद्ध होतील असेही सांगितले जात आहे.यासाठी कंपनीने 53-56 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे. एका लॉट अंतर्गत 2000 समभागांचा समावेश असणार आहे.

 कंपनीचा प्रारंभ

1999 मध्ये कंपनीची सुरुवात झाली होती. फ्रोझन आणि रेडी टू इट प्रक्रिया खाद्य बनवणारी कंपनी आहे. भारतातील दिग्गज कंपनी म्हणून या कंपनीचा उल्लेख केला जातो. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 117 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 34 टक्के महसूलमध्ये वाढ नोंदवली होती. त्याचवर्षी निव्वळ नफा 2.45 कोटी रुपये कमावला होता. सदरची कंपनी डॉमिनो, सबवे, बर्गर किंग यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चेन कंपन्यांना दर्जेदार मांसाहारी पदार्थ पुरवत असते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article