एकस लिमिटेडचा आयपीओ 3 तारखेला होणार खुला
06:09 AM Dec 02, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर :
Advertisement
एकस लिमिटेड यांचा आयपीओ 3 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 921 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत आहे. यात आयपीओची इश्यू किंमत 118 रुपये ते 124 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे.
Advertisement
समभाग सादरीकरण प्रक्रियेत कंपनी 670 कोटीचे ताजे समभाग व 251 कोटीचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे. बेळगावच्या हत्तरगीजवळ सेझअंतर्गत एकस लिमीटेडची कंपनी विमानांसाठीचे घटक निर्मितीचे कार्य करते. इंजिन सिस्टीमसाठीचे घटक, कार्गो व इंटिरिअर असेंम्बल यासारख्यासाठी सुटे भाग बनवते. 10 डिसेंबरला समभाग सुचीबद्ध होणार आहे.
Advertisement
Next Article